गेले दहा दिवस महाराष्ट्रातील प्रथम चतुर्मुख अतिशय क्षेत्र श्री.1008 मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये गेली दहा दिवस जयपुर येथील जीत शास्त्री यांच्या उपस्थितीमध्ये नित्य अभिषेक , पंचमेरू पूजन धर्मप्रभावना प्रवचन, विद्यार्थी पाठशाळा तसेच तत्त्वार्थ सूत्र वाचन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायंकाळी आरती झाल्यानंतर धार्मिक गेमसद्वारे जनजागृती धर्मप्रभावना खूप छान प्रकारे झाली. या सर्व पर्व काळामध्ये महिला व पुरुष वर्गाने 10 दिवस एकासण 10 श्रावक व श्राविकांनी केले, उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन धर्म प्रभावना केली.
कार्यक्रमाची सांगता पालखीने करण्यात आली. सर्व धर्म बांधवांनी क्षमावली मागून परवाची सांगता केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल मेहता, उपाध्यक्ष अरविंदजी गुरसाळकर, सुनील पुरवत,बाहुबली मेहता, सुदर्शन मेहता, सुहास दोशी,अतुल खडके,निलेश गुरसाळकर, शैलेश दोशी, अरुण कळसकर,विजयकुमार मेहता,रत्नदीप मेहता,अजित खडके,रविकांत शहा,संजय शहा,परिमल दोशी,राहुल बाभळे , बाहुबली दोभाडा,रोहित गांधी,यश गांधी,शाश्वत दोभाडा, सर्वांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.











