• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2026
in मुख्य बातमी
0
आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
0
SHARES
0
VIEWS

प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

दुर्घटनेतील चारही कामगारांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
२५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचावकार्य पूर्ण
दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विहीर बुजविणार; परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना

पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथे विहीर खोदकाम सुरू असताना माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळून विहिरीत अडकलेल्या चार कामगारांच्या बचावासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेले अभियान तब्बल २५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाले. या दुर्घटनेत चारही कामगारांचा मृत्यू झाला असून, घटनास्थळीच वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर चारही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

आंबे येथे रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी विहीर खोदकाम सुरू असताना अचानक माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग तसेच संबंधित बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

रविवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. विहिरीतील माती व दगडाचा मोठा ढिगारा आणि निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती यामुळे बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. बचावकार्यादरम्यान आवश्यक खबरदारी घेत एनडीआरएफच्या पथकाने उपलब्ध साधनसामग्री आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे मोहीम सुरू ठेवली. अखेर चारही कामगारांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

एनडीआरएफ, प्रशासन आणि ग्रामस्थांचे बचावकार्यात समन्वय

या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य केले. जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपदा मित्र, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही बचावकार्यासाठी आवश्यक सहकार्य केले. सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून ही मोहीम पूर्ण करण्यात आली.

बचाव मोहिमेचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः या ठिकाणी थांबून पार पाडले. तसेच कामगारांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले व धीर दिला. तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही रात्री एक वाजता आंबे येथे भेट देऊन बचाव मोहिमेची माहिती घेतली.

मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

बचावकार्यादरम्यान रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या कामगाराचा, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या कामगाराचा, तर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चौथ्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चारही मृतदेहांचे घटनास्थळीच वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विहीर बुजविणार

या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विहिरीबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या पथकाने दिलेल्या तांत्रिक सल्ल्यानुसार संबंधित विहीर बुजविण्यात येणार आहे. तसेच विहिरीच्या कडेला बॅरिकेडिंग करून परिसर सुरक्षित करण्यात येणार आहे. भविष्यात या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे.

दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन

या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीमार्फत संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.

विहीर खोदकाम सुरू असताना माती व दगडाचा ढिगारा नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, दुर्घटनेमागील तांत्रिक कारणे कोणती होती, तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या किंवा नाहीत, या सर्व बाबींची चौकशी समितीमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. चौकशीत कोणाचीही जबाबदारी अथवा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.

   

Previous Post

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

Related Posts

मुख्य बातमी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026
मुख्य बातमी

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

November 16, 2026
अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
मुख्य बातमी

अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 16, 2026
ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!
मुख्य बातमी

ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!

November 16, 2026
विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर
मुख्य बातमी

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

November 16, 2026
तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…
मुख्य बातमी

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

November 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

November 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026