• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2026
in मुख्य बातमी
0
0
SHARES
0
VIEWS

डिजिटल रेशीम शाळेचे ११ वे ऑनलाइन सत्र २० नोव्हेंबर रोजी

सोलापूर : अनिश्चित पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प (ITDP) आणि जिल्हा रेशीम कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल रेशीम शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘संगोपन गृह उभारणी व मांडणी’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.

तुती लागवड आणि रेशीम उत्पादन हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. इतर नगदी पिकांच्या तुलनेत तुती पिकाला कमी पाणी लागते. एकदा लागवड केल्यानंतर १५ ते २० वर्षांपर्यंत उत्पादन घेता येते. तसेच दर ३० ते ३५ दिवसांनी उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची संधी उपलब्ध होते.

‘डिजिटल रेशीम शाळे’च्या ११ व्या सत्रात रेशीम कीटक संगोपनासाठी आवश्यक असलेल्या संगोपन गृहाची उभारणी आणि मांडणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये संगोपन गृहाचा आदर्श आकार, उपलब्ध जागेनुसार उभारणीचे पर्याय, बहुस्तरीय रॅकची रचना, गोणपाट व ठिबक सिंचनाद्वारे तापमान नियंत्रण, हवा खेळती ठेवण्याच्या उपाययोजना तसेच उझी माशी नियंत्रणासाठी मच्छरदाणी जाळी आणि पिवळ्या सापळ्यांचा वापर याबाबत माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय ट्रे, चंद्रिका आणि निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक साहित्याची माहितीही दिली जाणार आहे.

मनरेगा अंतर्गत संगोपन गृह उभारणीसाठी उपलब्ध १०० टक्के अनुदान, बांधकामाचे टप्पे, पाया, दोन फूट प्लिंथ व सांगाडा उभारणी, रेशीम संचालनालयाच्या ॲपवर छायाचित्रे अपलोड करण्याची प्रक्रिया तसेच ‘सिल्क समग्र-२’ योजनेची माहिती या सत्रात देण्यात येणार आहे. एक तासाच्या या मार्गदर्शन सत्राच्या शेवटी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी प्रायमुव्ह संस्था तांत्रिक सहाय्य करीत आहे. जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी तसेच रेशीम शेती करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित ऑनलाइन मार्गदर्शन सत्रात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प आणि जिल्हा रेशीम कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Next Post

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

Related Posts

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
मुख्य बातमी

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026
अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
मुख्य बातमी

अक्कलकोटमध्ये पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 16, 2026
ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!
मुख्य बातमी

ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!

November 16, 2026
विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर
मुख्य बातमी

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

November 16, 2026
तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…
मुख्य बातमी

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

November 15, 2026
Next Post

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

November 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026