शिवरायांचा राज्याभिषेक ही क्रांती – सुधाकर महाराज इंगळे

0
18

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा वर्ष पूर्ती निमित्त ह भ प शंकर महाराज भोसले व अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने निराळे वस्ती सोलापूर येथे ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांच्या अमृत वाणीतून सात दिवस श्रीमदभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याप्रसंगी सुधाकर महाराज इंगळे बोलत होते की , शिवरायांचा राज्याभिषेक ही गरज होती. 700 ते 800 वर्ष हिंदूंचा राजा झाला नाही. त्यामुळे आपण चाकरी करणे. गुलाम म्हणून राहणे. या पेक्षा वेगळे विचार कुणाच्या ही मनात येत नव्हते. आपल्या परिसरातील अनेक सरदारांना शिवराय हे राजा म्हणून मान्य नव्हते. त्यामुळे राज्याभिषेक करणे खूपच गरजेचे होते. त्या परिस्तिथी मध्ये क्रांती करणे खूपच गरजेचे होते. शिवरायांना स्वतः राजा म्हणून प्रतिष्ठा मिळवायची नव्हती तर परिस्तिथी नुसार आवश्यक वाटलेला तो विचार महाराजांनी प्रत्यक्षात उतरविला.

मावळ्यांनी आपल्या जीवनाची आहुती देऊन होणाऱ्या राज्याभिषेक सोहळा तत्कालीन परिस्तिथीतील सर्वात मोठी क्रांती होती, असे मनोगत इंगळे महाराज यांनी व्यक्त केले. दररोज शिवरायांचे चरित्र व कथा सात दिवस संपन्न झाली . महाराष्ट्र राज्य मध्ये 350 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त कथा असा कार्यक्रम प्रथमच होत असून शिवविचार समाज मना पर्यंत – घरा घरात पोहोच करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या चालू असलेल्या कथेसाठी अनंत इंगळे महाराज, तानाजी बेलेराव , कृष्णा चवरे महाराज हे गायनाची साथ करत आहेत व गुरुसिद्ध गायकवाड, अनिकेत जांभळे, माऊली बेलेराव हे वादनाची साथ करत आहेत. या कार्यक्रमासाठी सचिन भोसले , रोहन येळणे , अनिकेत भोसले हे परिश्रम घेत आहेत.