सोलापूरचे माजी नगरसेवक तथा सिंधी समाजाशी संबंधित ज्येष्ठ नेते लालचंद वाधवाणी यांच्यावर गुरुनानक चौक परिसरातील सिंधी कॉलनीत धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. घटना एका सामाजिक विधीच्या कार्यक्रमादरम्यान घडल्याचे वृत्त आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रकाश किसनदास आडवाणी याने हा हल्ला केल्याचा आरोप असून, सुमारे २५ वर्षांपूर्वीच्या कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात वाधवाणी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.










