• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 5, 2026
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
0
SHARES
1
VIEWS

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान मोबिलिटी असलेले शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुणे आणि मुंबई देशातील फिनटेक इकोसिस्टीमची राजधानी झाल्या आहेत. पहिल्या तिमाहीत मुंबईने बंगळूरुला मागे टाकले असून एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी 61 % गुंतवणूक मुंबईत झाली आहे. फिनटेक स्टार्टअपमध्येही मोठी वाढ झाली असून 59% वाढ आणि 900 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. ही इकोसिस्टीम नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही नेण्याची गरज आहे. लवकरच नागपूरमध्येही बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू झालेली दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

पुणे वेगाने वाढणारे शहर आहे. या वेगाला अनुरूप आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. बाह्य आणि अंतर्गत रिंगरोडसोबत भुयारी मार्गाचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. पुढील 3 ते 4 वर्षांत पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करायची असून त्यामध्ये बजाज फिनसर्व्हचा आधुनिक परिसर महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुण्यात उभारण्यात येणारे बजाज फिनसर्व्ह पुणे परिसर आणि त्यातील सुविधा देशातील महत्त्वाची आणि शाश्वत व्यवस्था ठरणार आहे. या व्यवस्थेत सुमारे 40,000 कर्मचारी सहभागी होणार आहेत. परिसराला जोडणारा रस्ता आणि अतिरिक्त पूल इमारतींचे काम पूर्ण होण्यापूर्वी उभारण्यात येईल. बजाज समूहाने पुण्यात कला आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा मनोदय व्यक्त केला असून महानगरपालिकेसह सर्वांच्या सहकार्याने असे केंद्र उभारण्यात येईल, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्र पुढे असून राज्याला आणखी पुढे नेण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. डोमेस्टिक इन्शुरन्स आणि डिजिटल लेंडिंग मार्केटमध्ये महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम ठेवावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्राचे नेतृत्व अधिक भक्कम करण्यासाठी बजाज फिनसर्व्हने राज्य सरकारसोबत सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

Next Post

एकीकडे IT पार्क – उड्डाणपूलाची चर्चा तर दुसरीकडे विमानसेवेला घरघर…!

Related Posts

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील
इतर घडामोडी

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
इतर घडामोडी

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..
इतर घडामोडी

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

September 4, 2026
सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!
इतर घडामोडी

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

September 4, 2026
Next Post
एकीकडे IT पार्क – उड्डाणपूलाची चर्चा तर दुसरीकडे विमानसेवेला घरघर…!

एकीकडे IT पार्क - उड्डाणपूलाची चर्चा तर दुसरीकडे विमानसेवेला घरघर…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकीकडे IT पार्क – उड्डाणपूलाची चर्चा तर दुसरीकडे विमानसेवेला घरघर…!

एकीकडे IT पार्क – उड्डाणपूलाची चर्चा तर दुसरीकडे विमानसेवेला घरघर…!

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026