• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

युवा महोत्सवात आता भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वालीबरोबरच लावणीही रंगणार!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 14, 2023
in इतर घडामोडी
0
युवा महोत्सवात आता भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वालीबरोबरच लावणीही रंगणार!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर विद्यापीठ: सहा भारतीय लोककलांचा समावेश!
प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांची घोषणा
राजाभाऊ सरवदे यांच्यासह संघटनांची होती मागणी

सोलापूर, दि. 14- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीला विशेष महत्त्व असून यामुळे विद्यार्थ्यांचा समग्र व्यक्तिमत्व विकास घडविण्याचा प्रयत्न आहे. याच अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यंदाच्या वर्षापासून सहा नवीन भारतीय लोककलांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केली. यामध्ये भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली आणि लावणी या लोककला प्रकारांचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये भारतीय लोककला प्रकारांचा समावेश करण्याची मागणी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे यांच्यासह विविध संघटनांनी केली होती. त्याचबरोबर काही वर्तानपत्रातही यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या अनुषंगाने गुरुवारी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी युवा महोत्सवात समावेश असलेल्या विविध कला प्रकारांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या विविध बाबींचा विचार करून भारतीय लोककला व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली आणि लावणी या कलाप्रकारांचा समावेश करण्याची घोषणा केली. यातील काही कलाप्रकार युवा महोत्सवात होते, मात्र मागील सहा वर्षांपासून युवा महोत्सवातून वगळण्यात आले होते. त्यामुळे आता युवा महोत्सवात कला प्रकारांची संख्या वाढली आहे.

यंदाचा युवा महोत्सव हा दि. 10 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान पंढरपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वेरी कॉलेज) येथे रंगणार आहे. संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवाची तयारी सुरू केली आहे. आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या नवीन सहा कला प्रकारांची तयारीही विद्यार्थ्यांनी करावी. चांगल्या प्रकारे कलागुण सादर करण्यासाठीही विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन देखील प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले आहे.

Tags: BhajanBharudIn the Yuva MahotsavLavaniPowadaQawwaliShahiri Jalsa
Previous Post

शिवरायांचा राज्याभिषेक ही क्रांती – सुधाकर महाराज इंगळे

Next Post

माजी सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्थेने महापालिका आयुक्तांच्या सहकार्याने पाणी संकटावर विजय…

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
माजी सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्थेने महापालिका आयुक्तांच्या सहकार्याने पाणी संकटावर विजय…

माजी सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्थेने महापालिका आयुक्तांच्या सहकार्याने पाणी संकटावर विजय...

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026