येस न्युज मराठी नेटवर्क : करोना प्रतिबंधक लशीच्या किमतीला खासगी रुग्णालयांना २५० रुपयांची मर्यादा घालून दिल्याप्रकरणी बायोकॉन उद्योगसमूहाच्या अध्यक्षा किरण शॉ मुजुमदार यांनी सरकारवर टीका केली असून, इतकी कमी किंमत औषध कंपन्यांना परवडणारी नसून हा विश्वासघात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
खासगी रुग्णालयांना ही मर्यादा घालून दिल्याने लस कंपन्यांना टिकून राहणे कठीण जाणार आहे. मुजुमदार शॉ यांनी असा प्रश्न केला,की जागतिक आरोग्य संघटनेने एका मात्रेची किंमत ३ डॉलर ठरवून दिली असताना आपण ती २ डॉलर्स ठेवली आहे.