• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

Yes News Marathi by Yes News Marathi
October 21, 2026
in इतर घडामोडी
0
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
0
SHARES
0
VIEWS

‘आई राजा उदो… उदो’च्या गजरात शमीपूजन; भाविकांची मोठी उपस्थिती

सोलापूर : सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मातेचा सीमोल्लंघन पालखी सोहळा विजयादशमीनिमित्त मंगळवारी उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. ‘आई राजा उदो… उदो’च्या जयघोषात निघालेल्या सवाद्य पालखी मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक पद्धतीने शमीपूजन आणि सीमोल्लंघन करून दसरा सण साजरा करण्यात आला.

विजयादशमीनिमित्त सकाळी श्री रूपाभवानी मातेची काकड आरती व अलंकार महापूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी मंदिरातून बाहेर पडली. तुळजापूर वेसमार्गे पार्क चौकातून हुतात्मा पुतळ्याजवळील शमी वृक्षापर्यंत पालखी मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात आली. या वेळी पारंपरिक वाद्यांच्या गजराने आणि देवीच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.

या सोहळ्यासाठी मंदिराचे विश्वस्त, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिध्देश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, सोमनाथ मेंगाणे, संदेश भोगडे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हुतात्मा पुतळ्याजवळील शमी वृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वृक्षाला पाच प्रदक्षिणा घालून सीमोल्लंघनाची धार्मिक परंपरा पार पाडण्यात आली. उपस्थित भाविकांनी श्री रूपाभवानी मातेचे दर्शन घेतले. पालखीचे पूजन झाल्यानंतर एकमेकांना सोने अर्थात आपट्याची पाने देऊन दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

शमीपूजनानंतर पालखी मिरवणूक मसरे गल्ली येथे पोहोचली. तेथे अंबिका देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर भोगडे गल्ली येथील कसबा देवी (फिरकी अंबाबाई) मंदिरात जाऊन देवीची मनोभावे पूजा करण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध धार्मिक विधी आणि आरतीनंतर पालखी पुन्हा श्री रूपाभवानी माता मंदिरात आणण्यात आली.

Previous Post

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

Related Posts

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!
इतर घडामोडी

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद
इतर घडामोडी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

October 21, 2026
सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार
इतर घडामोडी

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार

October 21, 2026
कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम
इतर घडामोडी

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

October 21, 2026
पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद
इतर घडामोडी

पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद

October 21, 2026
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात
इतर घडामोडी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात

October 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026