येस न्यूज मराठी नेटवर्क : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारासाठी सज्ज होत आहेत. काँग्रेसचा महासचिव प्रियांका गांधी खासदार राहुल गांधी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव भाजपाचे अध्यक्ष जे. पी . नड्डा ,अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी या पाच राज्यांमध्ये उपचारांसाठी उतरलेले आहेत . सर्वच नेते मंदिरांमध्ये जात असल्याचे दिसून आले आहे. प्रियांका गांधी यांनी गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतले. राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील अप्पर मंदिरात पूजा-अर्चना केली. जे .पी .नड्डा यांनी काशी विश्वनाथ मंदिरात दुग्धाभिषेक केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मिर्झापूर येथे पहिल्यांदाच विंध्यवासिनी चे दर्शन घेतले.