नवी दिल्ली : DRDO च्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अॅन्ड अलाईड सायन्सेसने हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या मदतीने तयार केलेलं कोरोना विरोधी औषध 2 डीजी आजपासून उपलब्ध होणार असून याच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्या हस्ते करण्यात येत आहे. हा कार्यक्रम आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे.
DRDO ने हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीजच्या लॅबमध्ये 10 हजार डोस तयार केले गेले आहेत. डॉक्टर रेड्डीज लॅब जून महिन्यापासून दर आठवड्याला एक लाख डोसची निर्मिती करण्यास सुरवात करणार आहे. पाण्यात विरघळली जाणारी ही औषधे लवकरच इतर रुग्णालयातही उपलब्ध होऊ शकतात.
ऑक्सिजनची कमी गरज
DRDO च्या या औषधांचे 10 हजार डोस तयार करण्यात आले असून आजपासून DRDO च्या रुग्णालयात ते उपलब्ध होणार आहेत. क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, या औषधाचे सेवन केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना ऑक्सिजनची गरजही कमी लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत