संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ या सांस्कृतिक सोहळ्यात गीत, नृत्य आणि अभिनयातून संतपरंपरेचा जागर करण्यात आला. विशेष म्हणजे, संत ज्ञानेश्वर माउलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतल्याचा ऐतिहासिक प्रसंग जिवंतपटाच्या माध्यमातून साकारण्यात आला. या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभागाचे सहदेव खैरे, हभप लक्ष्मण चव्हाण महाराज, हभप सुधाकर इंगळे महाराज, हभप बळीराम जांभळे आणि हभप अभिमन्यू डोंगरे महाराज यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘श्री गणेशा’ गीताने झाली, तर विविध भक्तीगीतांनी वातावरणात भक्तिरस निर्माण केला.
कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी दितकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका अर्चना वडनाल, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सुधा अळळीमोरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ‘श्री गणेशा’ गीताने झाली. त्यानंतर ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘रंगाई होऊये’, ‘कॅनडा राजा पंढरीचा’, ‘रखुमाई रखुमाई’ अशा भक्तीगीतांनी वातावरणात भक्तिरस निर्माण केला. या सोहळ्यात अक्षता सावंत, जितेंद्र तुपे, कृष्णाई उळेकर, भूमिजा पाटील, जुई तनपुरे आणि शीतल पाटील यांनी विविध कलाविष्कार सादर केले.












