तोडणी व वाहतूक बिलांसाठी सिद्धनाथ कारखान्यावर आंदोलन;
वाहनमालकांच्या गव्हाणीत उड्या
येस न्यूज नेटवर्क : ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असतानाच आता ऊसतोडणी मजूर आणि वाहतूकदारही आक्रमक झाले आहेत. तोडणी बिल आणि ऊस वाहतूक बिल थकल्याने वाहनमालकांनी सिद्धनाथ साखर कारखान्यावर आंदोलन छेडले. थकीत बिलांच्या मागणीसाठी संतप्त वाहनमालकांनी कारखाना परिसरात जोरदार आंदोलन केले. यावेळी काही वाहनमालकांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीत उड्या घेतल्याने परिसरात खळबळ उडाली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दराचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसतानाच आता ऊसतोडणी मजूर आणि वाहतूकदारांच्या थकीत देयकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे साखर कारखानदारीसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.
एकीकडे शेतकऱ्यांचा ऊसदराचा संघर्ष, तर दुसरीकडे तोडणी मजूर आणि वाहतूकदारांची थकीत बिलांसाठी गव्हाणीत उड्या यामुळे जिल्ह्यातील साखर हंगामातील असंतोष आता नव्या वळणावर येऊन ठेपला आहे











