सोलापूर शहरातील प्रसिद्ध आणि आदरातिथ्य क्षेत्रात ख्याती असलेल्या ‘बालाजी सरोवर प्रीमियर’ला फूड कॉन्नोइसर्स इंडिया अवॉर्ड्स – नॅशनल एडिशन २०२५ च्या ९व्या आवृत्तीत ‘बेस्ट लक्झरी डायनिंग एक्सपीरियन्स (नॉन-मेट्रो)’ हा बहुमान प्राप्त झाला आहे.
३१ जुलै रोजी नवी दिल्लीतील द लीला अँबियन्स कन्व्हेन्शन हॉटेल येथे भरलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील भव्य सोहळ्यात देशभरातून आलेल्या १००० हून अधिक हॉटेल क्षेत्रातील दिग्गज, १५ मान्यवर ज्युरी सदस्य, आणि देशातील नामवंत शेफ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बालाजी सरोवर प्रीमियरचे प्रतिनिधि रेस्टॉरंट मॅनेजर रमेश कराडे आणि सूस शेफ प्रतीक हिरेमठ यांनी बालाजी सरोवर प्रीमियरच्यावतीने पुरस्कार स्वीकारले.

या प्रसंगी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक श्री. डी. राम रेड्डी, सरोवर हॉटेल्सचे अध्यक्ष श्री. अजय के. बकाया, बालाजी सरोवर प्रीमियरचे महाव्यवस्थापक विवेक जोशी, एफ अँड बी मॅनेजर अंबुज कुमार आणि एक्झिक्युटिव्ह शेफ महेश जाधव या सर्वांनी टीमचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यक्षमतेचा गौरव केला.
‘कोर्टयार्ड रेस्टॉरंट’ हे सोलापूरमधील एक प्रतिष्ठित रेस्टॉरंट असून, येथील आधुनिक पाककृती, स्थानिक पारंपरिक पदार्थांचा जागतिक पाककृतीसोबत केलेला संगम आणि आकर्षक सादरीकरण यामुळे रेस्टॉरंटने आपल्या खास ओळखीची छाप निर्माण केली आहे. येथील सेवा आणि जेवणाचा दर्जा, आलिशान वातावरण आणि अतिथींसाठी असलेली कटिबद्धता हीच या यशामागची खरी कारणं आहेत.

फूड कॉन्नोइसर्स इंडिया अवॉर्ड्स हे होरेका (हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग) उद्योगातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानले जाते. या वर्षीच्या आवृत्तीत देशभरातील २०० पेक्षा अधिक उत्कृष्ट आस्थापनांना गौरविण्यात आले. जागतिक दर्जाचे अनुभव स्थानिक परंपरेत रुजवण्याचा आमचा प्रयत्न या पुरस्काराच्या रूपाने सिद्ध झाला आहे. या यशामुळे बालाजी सरोवर प्रीमियरने फक्त सोलापूरचे नाव उंचावले नसून, नॉन-मेट्रो शहरांमध्येही लक्झरी डायनिंगसाठी नवे मापदंड निर्माण केले आहे असे बालाजी सरोवर प्रीमियरच्या व्यवस्थापनाने सांगितले.










