भूवैकुंठ पंढरी नगरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप येथे दि. 27-09-2026 पासून दि. 01-10-2026 पर्यंत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला असून महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन संपन्न झाले. या कार्यक्रमात दि. 30-09-2026 रोजी स. 10 वा. समाजातील व वारकरी संप्रदायातील सेवाधारी व्यक्तीचा सुधाकर इंगळे महाराज व माधव महाराज नामदास (संत नामदेव महाराज वंशज ) यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले . त्यामध्ये वारकरी संप्रदायातील अनेक तरुण मुलांना मृदंग वादन, गायन शिक्षण देऊन सुसंस्कारी बनविले आहे. महाराष्ट्र राज्यात दोन वेळा मृदंग वादना मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. म्हणून ह भ प जोतिराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच श्री अजित कवडे यांना ही त्यांच्या सामाजिक कार्या बद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . कारण समाजा विषयी त्यांच्याकडे तळमळ आणि वारकरी संप्रदायाची निष्ठा अढळ असून संस्काराची मोठी शिदोरी असल्याने त्यांना पुरस्कृत केले . भजनदास पाटील पापरी व सज्जन खोत कुरणवाडी यांना ही त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला . हा कार्यक्रम तुकाराम भोसले महाराजांनी आयोजित केला असून राम कदम महाराज, तुकाराम पाटील यांनी संयोजन केले होते . या कार्यक्रमामध्ये भागवत चवरे महाराज,काकासाहेब महाराज राशीनकर , अर्जुन चव्हाण, किरणराज घाडगे, लक्ष्मण सिरसट पापरकर, इ. प्रमुख अतिथीचा सन्मान करण्यात आला. तसेच श्रीगुरु सुधाकर इंगळे महाराज सेवा समितीने परिश्रम घेतले .











