येस न्युज मराठी नेटवर्क : यापूर्वी कधी अपक्ष तर कधी शिवसेनेकडून पंढरपूर -मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या समाधान आवताडे यांना यावेळी भाजपने उमेदवारी दिली आहे. उद्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील विजयसिंह मोहिते पाटील माजी मंत्री सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत भरला जाणार आहेदुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाआघाडी कडील उमेदवार अद्याप फिक्स झाला नाही उलट महागाडीमध्ये बंडखोरीची डोकेदुखी आहे त्यामुळे तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज कोणाला मिळणार याद्या गुलदस्त्यात आहे. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेली ही जागा पुन्हा महाविकास आघाडी लाच मिळावी म्हणून राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे तर ही जागा खेचून घेण्यासाठी भाजपने तन-मन-धन लावल्यामुळे समाधान आवताडे यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे नक्की काय काय होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे
