Yes News Marathi Network : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत स्व.भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती जयंत पाटील सोशल मीडियाद्वारे दिली आहे. भगीरथ भालके नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास असून भगीरथ भालके यांना शुभेच्छा असंही जयंत पाटील यांनी म्हंटल आहे.

