बेकायदेशीरच चिमणीला वाचण्यासाठी विमानतळ कशाला सोलापूर शहर शिफ्ट करा…!

0
135

सोलापूरच्या विमान सेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची 92 मीटर चिमणी वाचविण्यासाठी दररोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. याप्रकरणी हाय कोर्टात.तारखांवर तारखा पडत आहेत. काल महापालिकेच्या तसेच कारखान्याच्या वकील यांनी बाजू मांडली .आता पुढील सुनावणी 8 मार्च रोजी होणार आहे आता पुढील सुनावणी 8 मार्च रोजी होणार आहे. कारखान्याच्या वतीने काल हायकोर्ट मध्ये नव्यानेच एक याचिका दाखल करण्यात आली आहे . या चिमणी ला वाचवण्यासाठी सिद्धेश्वर कारखाना आणि कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी शरद पवार यांच्याकडे जाऊन काका मला वाचवा अशा भूमिकेत आहेत त्यामुळेच शरद पवार यांनीही चिमणी पाड कामाला विलंब करावा असे पत्र केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे सोलापूरची विमानसेवा सुरू होऊ नये अशी भूमिका बारामतीकरांची आहे शिवाय नियोजित बोरामणी येथील विमानतळाचा वनखात्याच्या 33 हेक्टर जागेमुळे प्रश्न सुटणे अवघड आहे सोलापूरच्या प्रगतीसाठी विमानसेवा गरजेचे आहे मात्र सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी हा तमाशा बघत बसले आहे. आता काडादी यांनी विमानतळात शिफ्ट करा आणि कारखान्याची चिमणी वाचवा असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. काही दिवसांनी प्रदूषित करणारा हा कारखाना वाचवण्यासाठी सोलापूर शहर दुसरीकडे शिफ्ट करा अशी याचिका कारखान्याने दाखल केली तर नवल वाटू नये एवढच एस न्यूज मराठी च्या माध्यमातून तमाम सोलापूरना सांगणे