येस न्युज नेटवर्क : नवाब मलिक यांनी अनेक कागदपत्रे दाखवली आहेत, कदाचित त्यामुळेच ईडीची कारवाई झाली असेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. मलिक साहेबांनी महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं आहे, भाजपचे काही पदाधिकारी उघडकीस आणले. गुजरातमध्ये देखील 22 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे ड्रग सापडलं. इथं उघड झालेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल असं वाटलं असेल, त्यामुळे कारवाई झाली असेल, आज संध्याकाळी मलिकसाहेब बाहेर आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल असेही यावेळी रोहित पवारांनी सांगितले.