अक्कलकोट : अक्कलकोट मतदार संघातील खानापूर येथे महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत प्रचार बैठक आयोजित करण्यात आली होती. खानापूर गावात सर्व लाडक्या बहिणींनी, माता-भगिनींनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी गावातील सर्व महिलांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे’ कौतुक करत महायुती सरकार सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले.खानापुरातील सर्व लाडक्या बहिणी, माता भगिनी तसेच सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून लोकप्रतिनिधी या नात्याने मला समाधान वाटले. गेल्या पाच वर्षातील विकास कामांच्या जोरावर खानापूर वाशी नक्कीच माझ्या पाठीशी उभे राहतील. असे प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी बोलताना केले.
तसेच म्हैसलगे, अंकलगे, देवीकवठे, हिळळी येथे प्रचार बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आणण्यासाठी ग्रामस्थांना मतदानरुपी आशीर्वाद देण्याची विनंती केली.
प्रसंगी सुनील खेड, परमेश्वर यादवाड, डॉ. अशोक हिप्पर्गी, महादेव मुडवे, गौडप्पा बिराजदार, भीमाशंकर बिराजदार, गंगाधर कोळी, हणमंतराव बिराजदार, श्रीशैल बतगुनकी, गौडप्पा बतगुनकी, रमेश माशाळे, मलप्पा कोळी, सागर हिप्पर्गी, भीमाशंकर जोकरे, बाबूषा कोरपे, गुरू मुडगी, शिवानंद मानशेट्टी अजीज सुतार, राजकुमार झिंगाडे आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.