सलगरवस्ती ही गिरणी कामगार,गवंडी कामगार,बांधकाम कामगार,मोलमजुरी ,रिक्षा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आपल्या मुलाने शिकावे,मोठा साहेब व्हावा ही प्रत्येक आई बाबा यांची इच्छा असते.शिवाजी कंदी नामक अशाच एका प्रामाणिक रिक्षाचालक यांनीही स्वप्न पाहिले आणि त्यांचा तृतीय मुलगा अक्षय हा नुकत्याच पार पडलेल्या एमपीएससी परीक्षेत N.T.B. प्रवर्गातून राज्यातून तिसरा क्रमांक सह उतीर्न झाला. महाराष्ट्र राज्यातून 368 वां आला.आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे ही जिद्द बांधून अक्षय कंदी यांनी अथक परिश्रम करून आपली कुटुंबाचे भविष्य उज्वल केलें.
अक्षय याचे प्राथमिक शिक्षण सलगरवस्ती येथे झाले,माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेत झाले,उच्य माध्यमिक शिक्षण A.D.जोशी कॉलेज मध्ये त्यानंतर 2020 साली वालचंद अभियांत्रिकी मध्ये मेकॅनिकल इंजिनियर ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानतंर त्यांनी पुण्याला राहून 4 वर्षे एमपीएससी तयारी केली.कांहीही झाले तरी आपण ही परीक्षा उत्तीर्ण होऊनच घरी परतणार हा चंगच बांधला.दररोज किमान 12 तास अभ्यास मन लाऊन केला.पुण्यातील ज्ञानदीप क्लासेसचे श्री महेश शिंदे सर, पी एस आय परीक्षा पास होणे करिता कायद्याचा अभ्यास खूप महत्वाचा असतो,त्याचे मोलाचे मार्गदर्शन उत्तम पवार सर यांचे कडून मिळाले.
अक्षय कंदी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड होताच, सलगर वस्ती येथील सर्व नागरिक ,मित्र परिवार,पाहुणे यांनी एकच जल्लोष केला,सर्वत्र आकाशच्या शुभेच्छा बॅनर लावले,पुण्याहून घरी येताच सलगरवस्ती येथे गुलाल उधळून जंगी मिरवणूक काढली,आपल्या मुलाचे होणारे स्वागत पाहून आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदअश्रू वाहू लागले.इतर पालकांनाही आपला मुलानेही असेच नाव काढावे यासाची घरोघरी आपल्या मुलांना सांगू लागली.
मी लहानणापासूनच आई वडिलांचे कष्ट पाहतोय,वडील अजूनही शालेय विद्यार्थी यांना शाळेत सोडतात,यावरच कुटुंबाची गुजराण,आपल्या कुटुंबाचे काबाड कष्ट हेच माझ्या यशासाठी प्रेरणा आहे,मी एवढ्यावरच न थांबता पुढील परीक्षेची तयारी करणार आहे. माझा
मोठा भाऊ मयूर,दोन नंबर भाऊ रोहित यांनी मोठे पाठबळ दिले, दोन्हीं वहिनी यांनीही खूप मदत केली.भविष्यात,वंचित गरीब,हुशार मुलांना आर्थिक मदत व मार्ग दर्शन करणार आहे. कामावर रुजू झालो की,समाजातील तळागाळातील अन्याग्रस्त लोकांना न्याय देणे,कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
मला तीन मुले,पहिला इंजिनिअर आहे दुसरा मुलगा एनटीबीसी मध्ये कार्यरत आहे पूर्वीपासूनच रिक्षा व्यवसाय करतो शालेय विद्यार्थ्यांना ज्ञान करून मी माझ्या कुटुंबाला आदर्श जीवन जगण्याचे संस्कार केले आहेत. सर्व कुटुंब सद्गुरूंच्या बैठकीस जाते लहानपणापासून मुलावर चांगले वाईट याचे संस्कार केले आहेत. मुलांनी आर्थिक परिस्थिती भेताची असतानाही अपार कष्ट व अभ्यास करून माझ्या कष्टाचे मोल जाणले. मला माझ्या मुलाबद्दल खूप कौतुक आहे. माझ्या परिसरातील सर्वांच्या मुलाकडून हीच अपेक्षा करतो.त्यांच्याही मुलांनी खूप अभ्यास करून मोठे व्हावे.