तासाभरात पडला ८०.४ मिलिमीटर पाऊस
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शिरापूर परिसरामध्ये तासाभरात ८०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सामान्यपणे ताशी 100 मिमी वेगाने पाऊस झाल्यास त्याला ढगफुटी म्हटली जाते. मात्र शिरापूर परिसरामध्ये पडलेला मंगळवारचा पाऊस त्यापेक्षा जास्त वेगाने होता.
चार महिन्याच्या उन्हाळ्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील सर्व शेतकरी होते. मंगळवारी चार जून पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली असून काल मंगळवारी संध्याकाळी शिरापूरकरानी ढगफुटीचा हाहाकार अनुभवला. ही ढगफुटी असल्याची कल्पना अनेकांना आली. मात्र हवामान तज्ञांच्या मते, काल शिरापुरात वीजेच्या कडकडाटासह झालेला अति मुसळधार पाऊस हा ढगफुटीपेक्षाही भयंकर होता.
४ जून रोजी पडलेल्या पावसाच्या सरींचा वेग एवढा जास्त होता की, ढगफुटीतील पावसाचा वेगही त्याने मागे टाकला. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र एवढा तुफ्फान पाऊस पडेल, याची कल्पना कुणालाही नव्हती.मोहोळ तालुक्याचे शिरापूर परिसरामध्ये सुरुवातीला रिमझिम पावसाची बरसात झाली. मग पावसाने थेट रौद्ररूप धारण करत मनसोक्त बरसला. 4 जून रोजी सायंकाळच्या सुमारास सुरवात झालेल्या पावसाची रात्रभर रिपरीप सुरू होती.
आकाशात वीजांचा प्रचंड कडकडाट आणि अखंड पाऊसधारांचा वर्षाव हे चित्र तब्बल तासभर चाललं. या तासाभरात शिरापूर पंचक्रोशीमध्ये पावसाचं जणू तांडव नृत्य सुरु होतं. या पावसामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झाले नाही.
उजनी कॅनल ही भरून वाहिला.
शिरापूर परिसरामध्ये उजनीचा कॅनल आहे या कॅनलला गेल्या चार महिन्यांमध्ये धरणाचे पाणी सोडण्यात आले नव्हते. मात्र मंगळवारी पडलेल्या पावसामुळे हा कॅनल उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर जसा भरून वाहतो तसा तो भरून वाहत होता.
पहिलाच मोठा पाऊस झाला.
खरीप हंगामासाठी काल पडलेला सर्वात मोठा पाऊस आहे पहिलाच पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाणी जमिनीत खूप पाणी मुरले आहे. एकाच पावसाने विहिरी आणि कोरड्या पडलेल्या बोअरला फरक पडेल असा अंदाज जाणकार शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे .