सोलापूर : नव्याने नियुक्त झालेले माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे सोमवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेत जॉईन झाले. तत्कालीन शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी यापूर्वीच पदभार सोडला होता. सकाळी जगताप हे जॉईन झाल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना भेटून पुस्तक भेट दिले. यावेळी आव्हाळे यांनी तत्कालीन शिक्षण अधिकारी मारुती फडके यांचा अनुभव पाहता तुम्हाला आता रजेवर जाता येणार नाही अशा सूचना केल्या.
यानंतर जगताप यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचीही भेट घेतली. तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची बदली झाल्यापासून माध्यमिक शिक्षण विभागालाही पूर्णवेळ कार्यालयात काम करणारा शिक्षणाधिकारी मिळाला नव्हता. यापूर्वीचे मारुती फडके यांची पूर्ण वेळ नियुक्ती झाली मात्र त्या आठ महिन्यात ते चार ते पाच वेळा दीर्घ रजेवर गेले होते त्यांच्या पश्चात तृप्ती अंधारे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार पाहिला होता.