सोलापूर : अनगर ( ता.मोहोळ ) येथील लोकनेते पॅलेस येथे जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली असता यावेळी २ लाख २६ हजार रुपयांची रोकड आणि ६ चारचाकी वाहने, ४० मोबाईल अशी १ कोटी ३ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
माजी आमदार राजन पाटील यांचे साम्राज्य असलेल्या अनगरमध्ये ही पहिल्यांदाच पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. राजन पाटील यांच्या वरदहस्थामुळे कारवाया होत नाहीत असा इथे बोलबाला आहे मात्र रात्री झालेल्या कारवाईमुळं सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. अनगर ते माढा या रोडवर अनगर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकनेते पॅलेस या दोन मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि परि.सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वखालील पोलीस पथकाने मंगळवार ( दि. २१ रोजी ) रात्री पावणे नवू वाजण्याच्या सुमारास लोकनेते पॅलेस या ठिकाणी छापा मारला.
त्यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रियाज बसू मुजावर मोहोळ, विनायक नीलकंठ ताकभाते सोलापूर, फारुख शेख याकूब, रा.ओम नगर, सुरत ( गुजरात ), नितीन गुंड अनगर, ओंकार विजय चव्हाण, चिंचनाका चिपळूण,( जिल्हा रत्नागिरी) राजु लक्ष्मण भांगे, मार्डी, ता. उत्तर सोलापूर, महादेव बंडोबा पवार सोलापूर,मनोज नेताजी सलगर सोलापूर,स्वप्नील कोटा सोलापूर, रोनक नवनीत मर्दा सोलापूर, हर्षल राजेंद्र सारडा सोलापूर, कृष्णा अर्जुन काळे सोलापूर, अनिल किसन चव्हाण सांगोला, धनप्पा भद्रे सोलापूर,अब्रार करीम फकीर चिपळूण (जिल्हा रत्नागिरी ) लखन जगदीश कोळी मोहोळ, सोमनाथ दादासाहेब मोरे मोहोळ, महादेव मुरलीधर दगडे करोळे ( ता.पंढरपूर), राम बलभीम कदम अनगर, कृष्णा कल्याण राऊत अकलूज, विलास धर्मराज कडेकर,वडवणी ( जी.बीड), सुशील कैलास लंगोटे माढा, हे आरोपी तीरोट नावाचा जुगार खेळताना सापडले.
तर दीपक चंद्रकांत गायकवाड मोहोळ , राजू हसन शेख पोखरापुर, ता मोहोळ, आय्याज इब्राहिम सय्यद, मोहोळ, दिनेश सुखदेव चवरे पेनुर , बालाजी केरबा भोसले कोंडी ,ओंकार नेहरू बरे मोहोळ, अप्पा सिद्राम पाटील घोडेश्वर मोहोळ, एकनाथ भगवान चांगिरे, परळी ( जि.बीड), विशाल रघुनाथ क्षीरसागर मोहोळ, संभाजी सोपान कवितकर, अनगर, (ता.मोहोळ), फिरोज बाबू शेख मोहोळ, सीताराम रामचंद्र कुंभार मोहोळ, सज्जन लक्ष्मण शेळके कोन्हेरी मोहोळ, गोविंद महादेव पाटील, कोंडी ( उत्तर सोलापूर), प्रशांत प्रकाश पाटील वैराग (ता.बार्शी), सोमनाथ भीमराव जोकारे, कांदलगाव दक्षिण सोलापूर हे ३८ लोक तिरोट खेळताना लोकनेते पॅलेस मध्ये दुसऱ्या मजल्यावर आढळून आले.
यावेळी महिंद्रा थार,महिंद्रा एक्स यू व्ही, स्विप्ट डिझायर, फोक्स वॅगन अशा ६ चारचाकी गाड्या, आणि १४ लाख ११ हजार रुपये किमतीचे ४० मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ३ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.