• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ होण्याची गरज – आयुक्त डॉ सचिन ओम्बासे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2025
in इतर घडामोडी
0
वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ होण्याची गरज – आयुक्त डॉ सचिन ओम्बासे
0
SHARES
0
VIEWS

· सोलापूरला ‘हरित शहर’ बनविण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

· महिला बचत गटांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा

· पावसात भिजत अधिकारी, कर्मचारी आणि बचत गटाच्या महिलानी केले वृक्षारोपण

सोलापूर- सोलापूर शहरातील वनक्षेत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात शहारतील उद्याने, रस्त्याची दुभाजके, मनपाच्या हद्दीतील खुल्या जागेमध्ये जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात 1 लक्ष वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार असून शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांनी यामध्ये सहभागी होवून वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ बनवावी, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी आज येथे केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात डॉ ओम्बासे बोलत होते.

     यावेळी उपायुक्त तैमूर मुलाणी,उपायुक्त किरणकुमार मोरे,सहायक आयुक्त मनीषा मगर,  सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सतीश चौगुले, पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे, उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जोशी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी आणि निवृत्त अधिकारी सतीश घोडके आदी उपस्थित होते. 

      आपल्या पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी सोलापूर शहरातील प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर किंवा अंगणात झाडे लावून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे. शहराला ‘हरित सोलापूर’ अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. यासाठी नागरिक आणि महिला बचत गटांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी केले.

        स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बैठकीसाठी आलेल्या  स्मार्ट सिटीचे चेअरमन व नगर विकास विभाग (१) चे प्रधान सचिव असीम  गुप्ता, पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि मनपा आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांचे हस्ते महापालिकेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री गुप्ता यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

अमृत 2.0 व दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियानांतर्गत वूमन्स फॉर ट्रीस, एक पेड मां के नाम उपक्रमांतर्गत शहरातील मनपा कॅम्प प्रशाला, गांधी नगर, मनपा शाळा क्र २, मंगळवार पेठ आणि मनपा उद्यान, जानकी नगर, जुळे सोलापूर या ठिकाणी उपायुक्त तैमूर मुलाणी, किरणकुमार मोरे, सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, सहायक आयुक्त मनीषा मगर आणि महिला बचत गटाकडून बकुळ, बहावा, मोहगनी, वड, पिंपळ, कदंब, करंज आणि सोनचाफा आदी देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली आणि महिलांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार,पर्यावरण व्यवस्थापक स्वनिल सोलनकर, दिलीप भामरे, इकोनेचर क्लबचे डॉ मनोज देवकर, सर्व समुदाय संघटक पल्लवी जिंदम, वसिम शेख, अंबादास जाधव, शशिकांत वाघमारे, जयश्री जाधव, नागेश क्षीरसागर, सागर गायकवाड, प्रियंका इंगळे, शीलाताई वाघमारे, राघवेंद्र अलकुंटे साईप्रसाद पोळ, गणेश हजारे, सुजाता जलदुर्ग, सत्यजित वडावराव, उज्ज्वला गणेश, उद्यान विभागाचे कर्मचारी सिद्राम बोराडे, सोमशंकर हलसंगी आदींनी परिश्रम घेतले.
Previous Post

भारत रत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मिती – महाविद्यालयाकडून विशेष सत्कार व पेटंटसाठी अर्ज

Next Post

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन...

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026