सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात धक्कादायक घटना घडली. पूर्ण झालेल्या विहिरीचं मोजमाप सुरू असताना अचानक ढिगारा कोसळला. यात चार मजुरांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांपासून एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू होतं. अखेर आज सकाळी 11 वाजता चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात NDRF टीमला यश मिळालं. शेतकरी निवास शिंदे यांच्या विहिरीचं काम पूर्ण झालं होतं. जवळपास 50 फूट खोलीच्या या विहिरीचं मोजमाप घेण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सदर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे.










