• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री सिद्धेश्वर यात्रेत भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे – निवासी उपजिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 10, 2023
in मुख्य बातमी
0
श्री सिद्धेश्वर यात्रेत भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे – निवासी उपजिल्हाधिकारी
0
SHARES
0
VIEWS

जिल्हाधिकारी कार्यालयात महायात्रा आयोजनाचा घेतला आढावा

सोलापूर – श्री सिद्धेश्वर महायात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी व पंचकमिटी यांनी नेमून दिलेली कामे व जबाबदाऱ्या चोख, काटेकोरपणे पार पाडाव्यात. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी आज येथे दिल्या.

श्री सिद्धेश्वर महायात्रा 2023 च्या आयोजनाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बहुउद्देशीय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीस तहसीलदार (महसूल) दत्तात्रय मोहोळ, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, पंच कमिटी व यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

श्री सिद्धेश्वर महायात्रेंतर्गत यात्रा कमिटी व पंचकमिटी यांनी नेमून दिलेली कामे करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करावी. तसेच प्रत्येक काम सूचिबद्ध करून विहित मुदतीत पूर्ण करावे, असे सांगून शमा पवार म्हणाल्या, होम मैदान येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस व वैद्यकीय सेवा इत्यादिंसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष, रूग्णवाहिका व वैद्यकीय कुमक, अग्निरोधक यंत्रणा आदि यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात. 24X7 आपत्कालिन मदत व प्रतिसाद केंद्र उभारावे. अन्नातून विषबाधासारखे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने् भेसळयुक्त पदार्थ विकले जाणार नाहीत, यासाठी दररोज अन्नपदार्थांची तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

शमा पवार म्हणाल्या, मंदिर कमिटीने प्रत्येक ठिकाणी उपकमिटी नेमावी व प्रत्येक उपकमिटीवर एक नोडल अधिकारी नेमून त्यांचे नाव व संपर्क क्रमांक जिल्हा प्रशासनाकडे व अन्य शासकीय विभागांकडे द्यावा, जेणे करून यात्रा कालावधीत परस्पर समन्वय ठेवणे सोयीचे होईल. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे. यात्रेदरम्यान अवैध व्यवसाय चालणार नाहीत, यासाठी पुरेशी काळजी घ्यावी. जागोजागी कचराकुंड्या ठेवून परिसर स्वच्छ ठेवावा. पिण्याचे पाणी व प्रसाधन गृहे आदिंची व्यवस्था करावी, असे त्या म्हणाल्या.

शमा पवार म्हणाल्या, मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन सीसीटीव्ही व्यवस्था, चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. अक्षता सोहळा भाविकांना पाहता येईल, यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करावी. मनोरंजन नगरीमध्ये सुरक्षित वीज पुरवठा करावा. शोभेचे दारूकाम, फटाके, स्फोटके याबाबतीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. रोड रोलर फिरवून होम मैदानची स्वच्छता ठेवावी. हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. होम मैदानमधील संपूर्ण ग्राऊंड व मनोरंजन नगरीमधील स्टॉलधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंजूर आराखड्यानुसार परवानगी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी दत्तात्रय मोहोळ यांनी आवश्यक विविध मौलिक सूचना केल्या. या बैठकीत बॅरिकेटस्‌, स्वयंसेवकांची मदत, पार्किंग झोन, आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावणे, वाहतूक व्यवस्था व नियंत्रण, अतितात्काळ प्रसंगी बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग व व्यवस्था यासह विविध महत्वांच्या बाबींवर सर्वंकष चर्चा करण्यात आली. विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

Previous Post

इंद्रभुनाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई

Next Post

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी बैठक

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी बैठक

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी बैठक

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026