सोलापूर : भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत देशभरात कामगार संहितांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘श्रम संवाद – जिल्हास्तरीय क्षमता बांधणी व जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश नियोक्ते, औद्योगिक प्रतिनिधी, मानव संसाधन (HR) व वित्त विभागातील अधिकारी, कायदेविषयक व्यावसायिक, सनदी लेखापाल तसेच इतर संबंधित घटकांना कामगार संहितांमधील विविध तरतुदींची माहिती देणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील हा कार्यक्रम बुधवार, दि. 18 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 1.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, पी-7, जयकुमारजी पाटील उद्योग भवन, एमआयडीसी, चिंचोळी, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी, नियोक्ते, उद्योग प्रतिनिधी, मानव संसाधन (HR) व वित्त विभागातील अधिकारी, कायदेविषयक व्यावसायिक, सनदी लेखापाल तसेच इतर संबंधित घटकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कामगार संहितांबाबतची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर मंगेश रा. झोले यांनी केले आहे.











