सोलापूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार, दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता नियोजन भवन सभागृह, शासकीय दुध डेअरी शेजारी, सात रस्ता सोलापूर येथे होणार आहे. राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीस खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत 04 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास तसेच बैठकीचे इतिवृत्तावर केलेल्या अनुपालन अहवालास मान्यता देणे. 31 डिसेंबर 2022 अखेरील सन 2022-2023 जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यांच्या खर्चाचा आढावा घेणे. राज्यस्तरीय समितीपुढे सादर करावयाच्या 2023-24 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आधिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे आदि विषयांवर चर्चा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.