• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 27, 2026
in Blog
0
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर
0
SHARES
0
VIEWS

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त २८ सप्टेंबर रोजी लोकसंस्कृती व सांस्कृतिक वैभवाचा सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या ज्ञान, भक्ती आणि समतेच्या विचारांचा जागर करण्यासोबतच महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृती व सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुरारजी पेठ, जुनी पोलीस लाईन, सोलापूर येथील सुशील रसिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती – लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैभव सोहळा’ या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि भक्तिपरंपरेचा लोकसंस्कृतीशी असलेला अनुबंध विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. ज्ञान, भक्ती आणि स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंना लोककला व सांस्कृतिक सादरीकरणाची जोड देत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन या सोहळ्यातून घडणार आहे.

या कार्यक्रमात पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, अक्षता सावंत, जितेंद्र तुपे, कृष्णाई उळेकर, भूमिजा पाटील, जुई तनपुरे आणि शीतल पाटील हे कलावंत सहभागी होणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, भक्ती, ज्ञान आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा सांस्कृतिक वारसा जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून सोलापूर व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ या विशेष सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका अर्चना वडणाल आणि सुधा अल्लीमोरे उपस्थित होत्या.

Previous Post

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

Next Post

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

Related Posts

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Blog

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

September 26, 2026
100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण
Blog

100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

September 26, 2026
रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
Next Post
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

September 27, 2026
सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026