गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील 285 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर यंदाच्या वर्षी ऐन पावसाळ्यात दुष्काळ जाहीर करण्याची वेळ महाराष्ट्र शासनावर आली. राज्यातही 32 जिल्ह्यातील 265 तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर खूप मोठा निधी मिळत नाही मात्र मलमपट्टी लावण्याचे काम शासनाकडून होते. बारा प्रकारच्या सवलती दिल्या जातात या सवलती कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. 28 सप्टेंबर पासून ते 5 ऑक्टोबर पर्यंत महसूल यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानी बाबत पंचनामे सुरू केले जाणार आहेत. जीपीएस आणि फोटोसह पंचनामाचे आदेश शासनाने दिले आहेत. आता चारा छावण्या कधी सुरू होणार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडेच दुष्काळात अडकलेल्या बळीराजाची लक्ष लागले आहे.










