सोलापूर : सोलापुरात रविवारी सकाळी नऊपासून पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली. विजापूर वेस, रेल्वे स्टेशन, नवल पेट्रोल पंप, रंगभवन अशा सर्वच ठिकाणी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी गवळी त्यांचे दुधाचे वरवे घालुन परतताना दिसत होते. सोलापूरकरांनी सुद्धा आजच्या या कडक संचारबंदी ला उस्फूर्त प्रतिसाद दिला असून मेडिकल आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणीही रस्त्यावर दिसत नव्हते.