• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठातर्फे दि. 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा!

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठातर्फे दि. 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा!
0
SHARES
0
VIEWS

राज्यातील 17 विद्यापीठातील कर्मचारी संघांचा सहभाग

सोलापूर, दि. 31- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी ‘कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक तथा प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी दिली. ही स्पर्धा दि. 3 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सोलापुरातील चार मैदानांवर होणार असून या स्पर्धेत राज्यातील १७ विद्यापीठांतील कर्मचारी संघाचे सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील विद्यापीठांतील कर्मचारी वर्गामध्ये क्रीडावृत्ती वाढविण्यासह आपसी सलोखा, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी दरवर्षी कुलगुरू चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. लीग कम नॉकआउट पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन होत असते. यंदा ही स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी सांगितले. ही स्पर्धा सोलापूर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम पार्क मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण, भंडारी ग्राउंड तसेच दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून, त्यामुळे शहरात एकाच वेळी चार ठिकाणी क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवार, दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी साडेचार वाजता विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे असणार असून उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू  प्रा. लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनापूर्वी सर्व संघांचा मार्च पास होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होईल. स्पर्धेचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता इंदिरा गांधी स्टेडियम, पार्क मैदान येथे होणार आहे.

या 17 विद्यापीठांच्या संघांचा सहभाग!

या स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांचा सहभाग असणार आहे.

Previous Post

सोलापूरकरांचा स्वरोत्सव : ७ ते ८ फेब्रुवारीला ‘प्रिसिजन संगीत महोत्सव’

Next Post

खाजगी बिल्डर्सच्या माध्यमातून शहरात घरे देणे शक्य : आयुक्त सचिन ओंबासे

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
खाजगी बिल्डर्सच्या माध्यमातून शहरात घरे देणे शक्य : आयुक्त सचिन ओंबासे

खाजगी बिल्डर्सच्या माध्यमातून शहरात घरे देणे शक्य : आयुक्त सचिन ओंबासे

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026