मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि पाच कोटी रुपयांचे घसघशीत बक्षीस मिळवल आहे .याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नाशिक येथे रविवार दिनांक 11 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील ,उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील अ,तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सभापती अमोल नलावडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या अभियानात नाशिक जिल्हा परिषदेने प्रथम , तर सांगली जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक मिळवला .
अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील २७६ ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवला. ग्रामपंचायतीचे आर्थिक सक्षमीकरण , मूलभूत सुविधांचा विकास ,नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन ,महिला आर्थिक सक्षमीकरण, नागरिकांचा लोकसहभाग या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अभियानात पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळावा अशी अपेक्षा 4 सप्टेंबर 2025 ला पुण्यातला एका कार्यशाळेत व्यक्त केली होती. यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन ही त्यांनी केले होते. पुणे जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांक मिळाला तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.










