• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरकरांचा स्वरोत्सव : ७ ते ८ फेब्रुवारीला ‘प्रिसिजन संगीत महोत्सव’

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरकरांचा स्वरोत्सव : ७ ते ८ फेब्रुवारीला ‘प्रिसिजन संगीत महोत्सव’
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूरमधील शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या शनिवार व रविवार, दि. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘प्रिसिजन संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे संपन्न होणार असून देशातील नामवंत कलाकारांची मैफिल रसिकांना अनुभवता येणार आहे. अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा महोत्सव यंदा दहाव्या वर्षात पदार्पण करत असून सोलापूर शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. शास्त्रीय संगीत व कलांचा प्रचार-प्रसार करणे, नव्या श्रोत्यांमध्ये संगीताची गोडी निर्माण करणे आणि मोठ्या प्रमाणावर रसिकांपर्यंत कला पोहोचवणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
पहिला दिवस : सतार आणि गायनाची मैफल
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी दोन सत्रांत कार्यक्रम होणार आहेत.

पहिल्या सत्रात प्रख्यात सतारवादक निखिल पटवर्धन यांचे सतारवादन होणार असून त्यांना पांडुरंग पवार (तबला) यांची साथ लाभणार आहे.

दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना सौरभ दांडेकर (हार्मोनियम), अजित किंबहुने (तबला) आणि प्राची जोगळेकर (तानपुरा) यांची साथ असेल.
दुसरा दिवस : बासरी, व्हायोलिन आणि स्वर-साधना
रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक एस. आकाश यांचे बासरीवादन होणार असून त्यांना ईशान घोष (तबला) यांची साथ लाभणार आहे. याच सत्रात यशेश रायकर यांचे व्हायोलिनवादन सादर होणार आहे.

महोत्सवाच्या अंतिम सत्रात सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित आपली स्वर-साधना रसिकांसमोर मांडणार असून त्यांना प्रशांत पांडव (तबला) व अभिषेक शिनकर (हार्मोनियम) यांची साथ लाभणार आहे.

हा संपूर्ण महोत्सव रसिकांसाठी नि:शुल्क असणार आहे. मात्र प्रवेशासाठी मोफत प्रवेशिका (फ्री पास) आवश्यक आहेत. प्रवेशिका मंगळवार दि. ३ फेब्रुवारीपासून हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ९ या वेळेत उपलब्ध असतील.

प्रवेशिका मिळवण्यासाठी रसिकांनी सिकंदर शेख (मो. ९८२२८९९५९२) यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेशिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिल्या जाणार असून आसनव्यवस्था त्यानुसार राहील.
प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित हा संगीत महोत्सव सोलापूरच्या सांस्कृतिक जीवनात भर घालणारा ठरणार असून शास्त्रीय संगीतप्रेमींनी या स्वरोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

दुसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 8 बाद 336 धावा, 156 धावांची आघाडी

Next Post

सोलापूर विद्यापीठातर्फे दि. 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा!

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठातर्फे दि. 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा!

सोलापूर विद्यापीठातर्फे दि. 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा!

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026