• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 13, 2026
in इतर घडामोडी
0
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
0
SHARES
3
VIEWS

१३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र-कर्नाटकात ‘महामार्ग जाम’, राजू शेट्टींचा एल्गार

येस न्यूज मराठी नेटवर्क: दिल्लीच्या वातानुकूलित दालनात केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली असून, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर टाकले आहे. सरकारच्या या उदास भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आता थेट आरपारची लढाई जाहीर केली आहे. उद्यापासून (१३ ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखून ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र पुसा येथे पार पडली. केंद्रीय कृषी मंत्री यावेळी बोलताना म्हणाले कि आम्ही दरवर्षीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मध्ये वाढ करून दिली आहे. यावर बोलताना शेट्टी म्हणाले कि तुमच्या विभागाने एफआरपी वाढविलेल्याचे सादरीकरण केले मात्र खते , कीटकनाशके , औषधे , मजूरी व तोडणी वाहतूक, साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च कितीने वाढली याची पण माहिती घ्या हि माहिती व याबाबतचे वास्तव सांगण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून वेळ मागत आहे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे वेळ नसल्याचे बैठकीत खडसावून सांगितले. साखरेचा हमीभाव गेल्या आठ वर्षात न वाढल्याने साखरेवर दिले जाणारे कर्ज कमी मिळत असल्याने कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत असल्याचे सांगितले. जरी केंद्र सरकारने एफआरपी मध्ये वाढ केली असली एफआरपीचा बेस वाढविल्याने त्याचा शेतकऱ्यांना काहींच फायदा झाला नाही. केंद्र सरकारने या तीन मागण्यावर तातडीने निर्णय न घेतल्यास उद्यापासून राष्ट्रीय महामार्ग बंद करून कारखान्यातून बाहेर पडणारी साखर सुध्दा अडविणार असल्याचे सांगितले.

याऊलट तीन तास झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषी मंत्री यांनी समिती नेमून येत्या महिन्याभरात विषयावर मार्ग काढू असा निर्णय दिला. यावेळी राजू शेट्टी संतप्त होवून दोन्ही मंत्र्यांसमोरच बैठकीत म्हणाले कि तुमच्याकडे कोणतेच अधिकार नव्हते तर बैठकीचे गाजर दाखविलेच का ? सरकारच्या या नकारात्मक भूमिकेनंतर शेतकरी नेते संतप्त होऊन बैठकीतून बाहेर पडले आणि त्यांनी दिल्लीच्या भूमीवरूनच या आक्रमक आंदोलनाची घोषणा केली.

कोल्हापूर-बेळगाव सीमेवरील कोगनोळी टोल नाका, कराड, सातारा आणि इंदापूर येथे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार आहेत.पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही राष्ट्रीय महामार्ग रोखले जातील. कर्नाटक राज्य रयत संघ आणि ग्रीन ब्रिगेडच्या वतीने हुबळी, गदग आणि हत्तरकी भागातील प्रमुख महामार्ग बेमुदत रोखले जाणार आहेत.

साखरेचा किमान हमीभाव प्रतिकुलो ५० रुपये आणि सी हेव्ही इथेनॉल दरात प्रतिलिटर ७० व केंद्र सरकारने लवकर हंगाम सुरू असल्याने प्रतिटन ५०० रूपये अनुदान या तीन मागण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. सदरची बैठक निष्फळ झाल्याने उद्या सकाळी ११ वाजल्यापासून दोन्ही राज्यांच्या सीमांवर आणि प्रमुख महामार्गांवर आंदोलक रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि उत्तर कर्नाटकात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. “आता चर्चा नाही, तर थेट निर्णय पाहायचा आहे. सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा सज्जड दम राजू शेट्टी यांनी दिला आहे.

या बैठकीस कर्नाटक राज्याचे सहकार मंत्री लक्ष्मण सवदी , कृषी मंत्री चलोराय स्वामी , साखर मंत्री रूद्राप्पा लमानी , केंद्र सरकारचे कृषी व अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Previous Post

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

Next Post

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

Related Posts

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन
इतर घडामोडी

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन

November 12, 2026
सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!

November 12, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

November 9, 2026
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!
इतर घडामोडी

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

November 8, 2026
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 8, 2026
Next Post
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026