• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2026
in इतर घडामोडी
0
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
0
SHARES
1
VIEWS

जिल्हाधिकारी चार तालुक्यांची, अपर जिल्हाधिकारी चार तालुक्यांची, तर निवासी उपजिल्हाधिकारी तीन तालुक्यांची पाहणी

जिल्ह्यातील ११ तालुक्यांत १२ व १३ सप्टेंबरला पाहणी; दुष्काळ परिस्थितीचा अहवाल तातडीने शासनाला सादर करणार

सोलापूर: पावसातील खंड आणि कमी पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी ४ सप्टेंबर रोजीच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची, पाण्याची व चारा उपलब्धतेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडून दुष्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी व धोत्री तसेच अक्कलकोट तालुक्यातील वळसंग, कोण्हाळी, कुरनूर, कुरनूर धरण परिसर, नाविंदगी या गावांना भेट देऊन दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड, जमिनीतील ओलावा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चारा याबाबत सविस्तर माहिती घेतली.

शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, ऊस, व मका या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांची पेरणी कधी करण्यात आली, पाऊस शेवटचा कधी झाला, त्यानंतर किती दिवसांचा पावसाचा खंड आहे आणि जमिनीमध्ये सध्या किती ओलावा आहे, याची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली. पिकांबरोबरच गावातील पिण्याच्या पाण्याची स्थिती आणि जनावरांसाठी उपलब्ध असलेल्या चारा-पाण्याचीही त्यांनी माहिती घेतली. तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वस्तुनिष्ठपणे दुष्काळ पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याबाबत निर्देशित केले. जेणेकरून शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळेल.

जिल्ह्यातील ११ तालुक्यांची दोन दिवसांत पाहणी
दुष्काळ परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके प्रत्यक्ष क्षेत्रात उतरविली आहेत. जिल्हाधिकारी चार तालुक्यांची, अपर जिल्हाधिकारी चार तालुक्यांची, तर निवासी उपजिल्हाधिकारी तीन तालुक्यांची पाहणी करणार आहेत. अशा प्रकारे १२ व १३ सप्टेंबर या दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील दुष्काळसदृश्य गावांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.या दोन दिवसांत महसूल प्रशासनासह दुष्काळ परिस्थितीशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी त्यांच्या कार्य क्षेत्रात राहून परिस्थितीची माहिती संकलित करणार आहेत. प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या अहवालांचे संकलन करून दुष्काळ परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला तातडीने सादर करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले की, शासनाच्या निकषांनुसार कमी पाऊस आणि पावसातील खंड हे दुष्काळ परिस्थितीचे महत्त्वाचे ट्रिगर मानले जातात. सध्या जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, मोहोळ आणि बार्शी या चार तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ व ट्रिगर-२ मध्ये येऊ शकतात. त्यामुळे संबंधित तालुक्यांतील परिस्थितीचे बारकाईने मूल्यांकन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सध्या ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आगामी काळात पाऊस न झाल्यास आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविण्यात येऊ शकते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उजनी धरण १०० टक्के भरले; लघु प्रकल्पांत पाणीसाठा
उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करून जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के लघु पाणी प्रकल्प भरून घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी : आमदार सचिन कल्याणशेट्टी
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळ परिस्थितीची तातडीने पाहणी करून त्याचा अहवाल शासनाला पाठवावा आणि शासनाने दुष्काळाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची संपूर्ण पाहणी पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. शासनाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, तहसीलदार विनायक नगर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरूळे यांच्यासह महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

Next Post

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
इतर घडामोडी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
Next Post
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026