• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
0
SHARES
1
VIEWS

एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट; महाराष्ट्राला ‘डायव्हिंग गर्ल्स चॅम्पियन ट्रॉफी’

श्रावणी सूर्यवंशीने रचला इतिहास; इंदौरच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकवला!

सोलापूर- मध्यप्रदेशातील इंदौर येथे दि. ७ ते १२ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झालेल्या ४२ व्या सब-ज्युनियर व ५२ व्या ज्युनियर नॅशनल एक्वेटिक चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सोलापूरची युवा डायव्हिंगपटू श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने आपल्या अफाट कामगिरीने इतिहास रचला आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना श्रावणीने या राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदके पटकावत दिमाखदार ‘गोल्डन पंच’ साधला. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने ‘डायव्हिंग गर्ल्स चॅम्पियन ट्रॉफी’ पटकावत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला.

श्रावणीने ८ सप्टेंबर रोजी १ मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारात १३८.०० गुणासह सुवर्णपदक पटकावत आपल्या विजयी मोहिमेला सुरुवात केली. त्याच दिवशी हायबोर्ड सिंक्रोमध्ये मनस्वी माने हिच्या साथीने २५६.८५ गुणासह दुसरे सुवर्णपदक मिळवले.यानंतर ९ सप्टेंबर रोजी ३ मीटर सिंक्रोमध्ये श्रावणी व मनस्वी माने या जोडीने १६९.६५ गुणासह प्रतिस्पर्ध्यांवर मात करत महाराष्ट्रासाठी तिसरे सुवर्णपदक मिळवले. १० सप्टेंबर रोजी ३ मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये श्रावणीने पुन्हा अव्वल कामगिरी करत २८४.४० गुणासह चौथे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.स्पर्धेच्या अंतिम दिवशी हायबोर्ड प्रकारातही श्रावणीने सुवर्ण कामगिरीची परंपरा कायम ठेवत २८४.९० गुणासह पाचवे सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे एका राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकण्याचा अभूतपूर्व पराक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला.

पाच सुवर्णांची ताकद; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!

श्रावणीच्या या पाच सुवर्णपदकांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने डायव्हिंग गर्ल्स चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. वैयक्तिक पदकांची लयलूट आणि महाराष्ट्राला मिळवून दिलेली सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी यामुळे श्रावणीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

श्रीकांत शेटे सरांच्या प्रशिक्षणाचा ठसा

श्रावणीच्या या ऐतिहासिक यशामागे तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मोलाचे योगदान आहे. शिस्तबद्ध, कडक आणि शास्त्रोक्त प्रशिक्षणातून त्यांनी श्रावणीला डायव्हिंगमधील अत्यंत कठीण तांत्रिक बारकावे आत्मसात करून दिले. सातत्यपूर्ण सराव, अचूक तंत्र आणि आत्मविश्वासाच्या जोरावर श्रावणीने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.सोलापूरच्या या कन्येने पाच सुवर्णपदकांची ऐतिहासिक कमाई करत महाराष्ट्राचा गौरव वाढवला असून, तिच्या ‘गोल्डन पंच’मुळे क्रीडाक्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

Next Post

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
Next Post
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026