• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2026
in इतर घडामोडी
0
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे सन २०२७ मध्ये २०० वे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये एप्रिल २०२६ ते एप्रिल २०२७ या कालावधीत वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता, शेतकरी कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि लोकशाहीविषयक जाणीव विकसित व्हावी, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत २२ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले जयंती उद्घाटन व प्रतिमा पूजन, विचार जनजागृती रॅली, शाळास्तरावर भित्तीचित्र अभियान आणि जीवनपरिचय आढावा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जून महिन्यात जलसंवर्धन अभियान, शेतकरी व जलव्यवस्थापनविषयक उपक्रम, बालसभा आणि शाळा स्वच्छता अभियान राबविण्यात येईल.

जुलै महिन्यात समता कथा व चर्चा, महात्मा फुले लिखित अखंड पाठांतर स्पर्धा, गावांमध्ये समता भिंत उपक्रम आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यासाठी समता दौड आयोजित केली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत कार्यक्रम, वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच महात्मा फुले साहित्य वाचन अभियान राबविण्यात येईल.

सप्टेंबरमध्ये शिक्षक गौरव, नवोपक्रम स्पर्धा, विज्ञान व माहिती-तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम; ऑक्टोबरमध्ये स्त्री सक्षमीकरण, भूमिका अभिनय, पोस्टर स्पर्धा आणि ‘महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये संविधानावर आधारित पुस्तकांचे वाचन, नेतृत्व विकास आणि जनजागृती रॅली, तर डिसेंबरमध्ये सांस्कृतिक महोत्सव, चित्रकला स्पर्धा व लोककला सादरीकरण होणार आहे.

जानेवारी २०२७ मध्ये प्रकल्पकार्य, स्थानिक इतिहास अभ्यास, मुलाखत उपक्रम व प्रदर्शन; फेब्रुवारीमध्ये वादविवाद, निबंध, प्रकल्प सादरीकरण आणि पोस्टर निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात येतील. मार्च २०२७ मध्ये समारोप कार्यक्रम, ‘फुले समता पुरस्कार’ वितरण, अनुभव लेखन आणि अहवाल सादरीकरण करण्यात येणार आहे.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समता, पर्यावरणविषयक जागरूकता, नेतृत्व, सर्जनशीलता, संशोधन आणि अभिव्यक्ती कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांनी नियोजन आणि संनियंत्रण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

Previous Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

Next Post

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

Related Posts

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार
इतर घडामोडी

प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

October 29, 2026
ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन
इतर घडामोडी

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

October 28, 2026
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा
इतर घडामोडी

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा

October 28, 2026
Next Post
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026