• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2026
in इतर घडामोडी
0
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
0
SHARES
1
VIEWS

पंढरपूर : पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांची गैरसोय टाळण्यासाठी भूसंपादन अधिकारी क्रमांक 3 यांचे तात्पुरते कार्यालय पंढरपुरात सुरू करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवास येथे हे कार्यालय सुरू होणार असून, दर आठवड्याला मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवशी कार्यालयीन कामकाज चालणार आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या कामासाठी बाधितांना प्रत्येक वेळी सोलापूरला जाण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिली.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखडा तथा पंढरपूर कॉरिडॉर’ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासाठी अधिसूचित केलेल्या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात येणार आहेत. या जमिनींमध्ये हितसंबंध असलेल्या मालमत्ताधारकांनी नुकसानभरपाईच्या अनुषंगाने आपले म्हणणे सादर करणे आवश्यक आहे.यासाठी बाधित मालमत्ता धारक यांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. संबंधितांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक ३, सोलापूर यांच्या तात्पुरत्या कार्यालयात उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे. हे कार्यालय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवास येथे सुरू राहणार आहे.

भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांनी नोटीस प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत कार्यालयीन वेळेत स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधी किंवा वकिलामार्फत आपले म्हणणे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधितांनी बाधित होणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ व तपशील, जमिनीवरील वास्तू, मालमत्तेचा वापर, मालमत्तेतील हितसंबंधांचे स्वरूप तसेच अपेक्षित नुकसानभरपाईची रक्कम, दाव्याचे तपशील, पुरावे आणि संबंधितांचा हिस्सा याबाबतची माहिती सादर करावी. जमिनी अथवा मालमत्तेसंदर्भात काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या निर्धारित मुदतीत नोंदवाव्यात, असेही जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी सांगितले आहे.

पंढरपुरातच भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय सुरू होणार असल्याने कॉरिडॉर बाधित मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोलापूरला वारंवार जाण्याचा त्रास व वेळ वाचणार असून, भूसंपादन आणि नुकसान भरपाईसंदर्भातील प्रक्रिया अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.

Previous Post

प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

Next Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

Related Posts

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन
इतर घडामोडी

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

October 28, 2026
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा
इतर घडामोडी

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा

October 28, 2026
Next Post
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026