विजापुर नाका पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट

0
15

विजापुर रोड परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्ये व खेळ असलेले लेझीम, ढोल,झांज व टिपरी आदी खेळांचा नियमास अधीन राहून रोज रात्री सराव करीत आहेत.या मंडळांना पोलीस प्रशासनाने अनुमती देऊन सहकार्य करावे यासाठी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने मागणी केली.
विजापुर नाका पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट घेतली.

प्रारंभी मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सदस्य विजय शाबादी यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.ट्रस्ट अध्यक्ष सुभाष चव्हाण व उत्सव अध्यक्ष महेश देवकर यांनी श्री.वाघचौरे यांचा सत्कार करुन गणेशोत्सव उत्साहाने व शांततेने साजरा करण्यासाठी मध्यवर्ती मंडळ प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.यावेळी ट्रस्ट पदाधिकारी शाम धुरी, ट्रस्ट सचिव विश्वनाथ आमणे,मधुमती चाटे,सौ.वैशाली माशाळ, शाम कदम,गणेश ससावे,आकाश माने,प्रसाद बिराजदार,आनंद बिराजदार आदी उपस्थित होते.