• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

Yes News Marathi by Yes News Marathi
July 20, 2026
in Blog
0
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात
0
SHARES
11
VIEWS

पहिल्यांदाच महिलांचे बचाव पथक; ‘ रेड क्रॉस च्या माध्यमातून वैद्यकीय पथक उपलब्ध झाल्यास बोट ॲम्ब्युलन्स’ तयार असेल

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली तर अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी व निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दक्ष आहे.

पंढरपूर, दि. २०: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदी व पालखी मार्गावर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. यंदा पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे महिलांचे बचाव पथक वारीत सहभागी होणार आहे.

आपत्कालीन साहित्य सज्ज
आपत्कालीन व्यवस्थेकरिता सहा अग्निशमन वाहने आणि एक रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आली आहे. रेस्क्यू व्हॅनचे इनचार्ज पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संभाजी कारले आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या होड्यांसाठी एक हजार पंचेचाळीस लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता जेडे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अकरा, पुणे जिल्ह्यातील दोन आणि एनडीआरएफच्या चार अशा एकूण सतरा रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. रेस्क्यू बोटीसाठी शंभर लाईफ जॅकेट, तीस लाईफ रिंग, नऊ वॉकी-टॉकी, पाच मेगाफोन, चार इन्फ्लेटेबल टेंट, सहा मिमी स्टॅटिक रेस्क्यू रोप, पाच टॉर्च, दोन लेजर पॉइंटर व दोन लाईट बॅटन अशी सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. या संपूर्ण यंत्रणेचे इनचार्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले आहेत.

चंद्रभागेत १८० आपदा मित्रांचे नियोजन
चंद्रभागा नदीत गस्त व बचाव कामासाठी एकूण एकशे ऐंशी आपदा मित्रांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एनडीआरएफचे तीस जवान, ठाणे आपदा मित्रचे दोन, वाशीम जिल्हा आपदा मित्रचे दहा, आपत्ती संघ पिंपरी-चिंचवडचे दहा, वन्यजीव रेस्क्यू पुणेचे दहा, मुळशी आपत्ती समिती पुणेचे दहा, हेल्पिंग हँड शिरोळ कोल्हापूरचे वीस, सारथी फाउंडेशन सोलापूरचे दहा, चंद्रभागा रेस्क्यू फाउंडेशन कान्हापुरी जि. सोलापूरचे दहा, पंढरपूर शहरातील आदिवासी रेस्क्यू कोळी समाज होडीवाल्यांचे तीस, रेड फेरी ग्रुप सोलापूर या महिला रेस्क्यू पथकातील पंधरा, महाराष्ट्र रेस्क्यू फाउंडेशन पंढरपूरचे पाच आणि सोलापूर जिल्ह्यातील वीस पोलिस पाटील यांचा समावेश आहे. यासोबतच वारी कालावधीसाठी दोन मेकॅनिक पंढरपूरमध्ये तैनात करण्यात आले आहेत.

पहिल्यांदाच महिलांचे बचाव पथक
आषाढी वारीत पहिल्यांदाच महिलांचे बचाव पथक सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे असणार आहे. या पूर्वी या पथकाने २०२५ मधील सीना नदीच्या पुरात दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३०० नागरिकांच्या बचाव कार्यात सिंहाचा वाटा उचलला होता. तसेच कार्तिक वारी, २०२५ मधील चैत्र व माघ वारीतही या पथकाने बचाव कार्य केले आहे.

बोट ॲम्ब्युलन्सचे नियोजन
रेड क्रॉसच्या माध्यमातून वैद्यकीय पथक उपलब्ध झाल्यास बोट ॲम्ब्युलन्स तयार असेल , अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली. चंद्रभागा नदीपात्र व घाट परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी यंत्रणा २४ तास दक्ष राहणार आहे.

Previous Post

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026