• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2026
in इतर घडामोडी
0
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
0
SHARES
3
VIEWS

पंढरपूर शहरातील सुविधांची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी बुलेटवर फिरून केली

मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोफत अन्नाचे वाटप पालकमंत्री गोरे यांनी भाविकांना केले

व्हीआयपी दर्शन बंद झाल्याने भाविकांना ताटकळत उभे राहण्याचे सात ते आठ तास झाले कमी.

भाविकांशी साधला संवाद; स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश

पंढरपूर- आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथील पत्रा शेडजवळील रिद्धी-सिद्धी दर्शन रांग, वाळवंट, मंदिर परिसर व भक्तीसागर या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आत्तापासूनच व्हायला सुरुवात झाली आहे. गर्दीमध्ये व्हीआयपी वाहनांचा ताफा नको , म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवून ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेट वरून पाहणी केली.

यावेळी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी पालकमंत्री गोरे यांनी संवाद साधला व प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांविषयी विचारपूस केली. दर्शन रांगेतील भाविकांनी प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.

पालकमंत्री गोरे म्हणाले, गेल्या दीड महिन्यांपासून प्रशासनाने आषाढी वारीनिमित्त भाविकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. केलेल्या कामाबद्दल आपण समाधानी असून येथे येणाऱ्या वारकरी-भाविकांचे उत्साहाने स्वागत करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

स्वच्छतेवर भर:
पालकमंत्र्यांनी दर्शन रांगेतील भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या व्यवस्थेची पाहणी केली. शौचालयाची स्वच्छता नियमित राखण्याबाबत त्यांनी मुख्याधिकारी रोकडे यांना निर्देश दिले. तसेच वाळवंट व भक्तीसागर परिसराची पाहणी करून या ठिकाणी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना आवश्यक सूचना दिल्या.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असून त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे सात ते आठ तास भाविकांना ताटकळत उभे राहण्याचा वेळ कमी झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री जयकुमार गोरे हे शासकीय विश्रामगृह ते पत्रा शेड येथील दर्शन रांगेपर्यंत स्वतः बुलेट घेऊन दर्शन रांगेच्या पाहणीसाठी आले, पाठीमागे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन होते. तर दर्शन रांग ते वळवंट परिसरापर्यंत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुलेट घेतली

पालकमंत्र्याकडून दर्शन रांगेतील भाविकांना तांदळाच्या खिचडीचे वाटप – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी मोफत अन्न दानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आज पालकमंत्री जयकुमार गोरे हे दर्शन रांगेची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी स्वतः दर्शन रांगेतील भाविकांना तांदळाच्या ‍ खिचडीचे वाटप केले.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह संबंधित ठिकाणचे स्थानिक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: ५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश

Related Posts

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
Next Post
नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: ५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश

नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: ५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026