• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
July 20, 2026
in इतर घडामोडी
0
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर जिल्ह्यात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे भक्तीमय वातावरणात उत्साहाने स्वागत

विठू माऊलीचा गजर करत जेसीबी मधून पालखी सोहळा रथावर पुष्पवृष्टी

पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उप जिल्हाधिकारी उत्तम दिघे यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे पालखीचे सूत्रे सोपवली

अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयात नेत्रदीपक रिंगण सोहळा; हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचीही उपस्थिती

पंढरपूर- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सराटी- अकलूज येथे सोलापूर जिल्हा प्रवेश करताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी अत्यंत भक्तिभावाने श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन व अश्व पूजन करून स्वागत केले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, पंचायत समिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, सुमित शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ यांच्यासह सोलापूर- पुणे जिल्ह्यातील अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या सोबत असलेले अश्वचे पूजन केले. त्यानंतर नीरा नदीचा पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यात पालखी रथाचे आगमन होत असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जेसीबी मधून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी भाविक यांनी विठ्ठल नामाचा, तुकाराम महाराजांच्या नाम घोष करून सर्व परिसर भक्तीमय केला.

त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला व पालखीचे मोठ्या उत्साहाने व आनंदाने स्वागत केले. तत्पूर्वी पुणे जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांनी श्री संत तुकाराम महाराज पालखीची सर्व सूत्रे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे दिली. स्वागताच्या ठिकाणी संध्याताई तिवाडी यांचे व त्यांचे पथक यांचे भारुड गायन झाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले रथाचे सारथ्य-
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन व पालखी स्वागत केल्यानंतर महाराजांच्या पालखीचे सारथ्य ही केले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे ही उपस्थित होते.

मराठी कलाकारांची उपस्थिती
हा स्वागत सोहळा पाहण्यासाठी मराठी चित्रपट व टीव्ही अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री शिवानी परब, संजना काळे उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी सुविधा
पालखी सोहळा स्वागत ठिकाणी वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सोयी-सुविधांची माहिती यावेळी पालखी सोहळा प्रमुखांना देण्यात आली. पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे व निवारा केंद्रांबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आरोग्य विभागाच्या वतीने येथे हिरकणी कक्ष मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्य उपचार केंद्र आदी सुविधा दिलेल्या असून हजारो भाविक या सुविधांचा लाभ घेत होते. तसेच पालखी सोहळ्याबरोबर आरोग्य बाईक ची सुविधा ही देण्यात आली आहे.

अकलूज येथे नेत्रदीपक रिंगण:
दरम्यान, अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या भव्य मैदानावर पालखी सोहळ्यातील पारंपरिक रिंगण सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला. अश्वांनी घातलेल्या रिंगणाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. याच देही, याच डोळा अश्व रिंगण पाहून उपस्थित हजारो अकलूजकर तसेच परिसरातील नागरिक मंत्रमुग्ध झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात व ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने उपस्थित हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. संपूर्ण अकलूज नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

Previous Post

‘संवाद वारी’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; योजनांची घेतली माहिती

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026