युवक काँग्रेस “माझा प्रभाग माझी शाखा” माध्यमातून जास्तीत जास्त युवक महानगरपालिकेवर निवडून येतील- प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत

0
15

सोलापूर- अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आमदार प्रणिती ताई शिंदे व सोलापूर काँग्रेस समिती अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध सहा ठिकाणी माझा प्रभाग माझी शाखा उदघाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस दीपक राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

सिव्हिल चौक खड्डा तालीम, भारती विद्यापीठ चौक, सैफुल पोलीस चौकी समोर,कुमठे, चांदतारा मस्जिद दोन नंबर झोपडपट्टी, यतीमखाना वांगी रोड सोलापूर या ठिकाणी माझा प्रभाग माझी शाखा उदघाटन करण्यात आले. तसेच जनवात्सल्य बंगल्यावर अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य पदी आमदार प्रणिती ताई शिंदे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आपल्या मनोगतात म्हणाले महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात शहरात माझा प्रभाग माझी शाखा मोठ्या प्रमाणात होत आहे. या शाखेच्या माध्यमातून युथ जोडो बुथ जोडो अभियान राबवत आहोत.यामध्ये जास्तीत जास्त युवकांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या लोकसभा,विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीमध्ये बुथ मजबूत करून काँग्रेस पक्षाला विजय करण्यासाठी युवक काँग्रेस सज्ज आहे. महानगरपालिकेत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जास्तीत जास्त निवडून येतील असेही ते म्हणाले.

यावेळी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर,अनंत म्हेत्रे ,प्रवीण जाधव,मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापूरे,शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे,दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे,काँग्रेस मागासवर्गीय सेल अध्यक्ष मयूर खरात,राजासाब शेख, धीरज खंदारे,रोहन साठे, महेंद्र शिंदे,समीर काझी,जिवक इंगळे,अमोल माशाळे,अबरार शेख,आकाश चव्हाण, निखिल हुवाळे,सरफराज शेख, कासिमअली शेख,चंद्रकांत नाईक, सुभाष वाघमारे,युवराज दोडमनी, दिनेश डोंगरे,आकाश नाईक,मुबारक मकानदार,नासिर शेख आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शाखा उद्घाटनास मोठ्या संख्येने उपस्थित होते.