• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 21, 2026
in Blog
0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी
0
SHARES
4
VIEWS

चिखल व पाणी साचू नये यासाठी मुरमीकरण; दर्शन रांगेत पाणी, जेवण व आरोग्य सुविधा सुरळीतपणे देण्याचे निर्देश

पंढरपूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज वाखरी पालखी तळ, पत्राशेड दर्शन रांग, वाळवंट व भक्ती सागर येथे वारकरी व भाविकांसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.

वाखरीत मुरमीकरण व पाईपची व्यवस्था
दिनांक १८ जुलै रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाऊस सुरू असताना वाखरी पालखी तळाची पाहणी केली होती, येथे पावसामुळे चिखल झाला होता. त्या ठिकाणी तात्काळ मुरमीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुरमीकरणाचे काम सुरू आहे. तसेच पाणी साचू नये म्हणून पाईप टाकण्यात आले आहेत. या कामाची पालकमंत्री गोरे यांनी पाहणी केली. या ठिकाणी अजिबात चिखल व पाणी साचणार नाही, या दृष्टीने काम झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.

दर्शन रांगेतील सुविधांवर भर
दर्शन रांगेत भाविकांना त्रास होणार नाही यासाठी पाण्याची पुरेशी सोय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे मोफत जेवण योग्य पद्धतीने व प्रत्येक भाविकाला मिळेल अशा पद्धतीने वाटप करावे, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य व वीज पुरवठ्याबाबत सूचना
ठिकठिकाणी नियुक्त केलेल्या आरोग्य पथकामध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. या भागात रात्रीच्या वेळी वीज जाणार नाही, यासाठी वीज वितरण कंपनीशी समन्वय ठेवून काम करण्यास सांगितले.

स्वच्छतेवर विशेष लक्ष
या सर्व ठिकाणी स्वच्छतेला महत्त्व असून पंढरपूर नगरपरिषद, मंदिर समिती तसेच अतिरिक्त नियुक्त करण्यात आलेले सफाई कर्मचारी यांनी वेळोवेळी तात्काळ हा सर्व भाग स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. तसेच वाखरी पालखीतळ भक्ती सागर वाळवंट व दर्शन रांगेत ज्या ज्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा पुरेसे सफाई मनुष्यबळ तसेच सक्शन मशीन आदि ची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करून शौचालय नियमितपणे स्वच्छ राहतील या दृष्टीने नियुक्त केलेल्या सुपरवायझरने काटेकोरपणे काम करावे, असेही पालकमंत्री गोरे यांनी निर्देशित केले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखी तळ भक्ती सागर (65 एकर), रिद्धी सिद्धी दर्शन मंडप,दर्शन रांग येथील पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी महेश रोकडे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

Next Post

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

Related Posts

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती
Blog

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर
Blog

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन
Blog

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन

August 11, 2026
राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय
Blog

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

August 11, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड
Blog

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त
Blog

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
Next Post
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026