आज माहिती अधिकारी दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांचे मार्गदर्शनाखाली कार्यशाळा व प्रश्नमंजूका घेऊन केला.
यावेळी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि शासकीय कामकाज जनतेसाठी खुले करणे. तसेच नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढवितो हा कायदयाचा मुख्य उद्देश आहे, अर्जदाराने मागतिलेली माहिती 30 दिवसाच्या आत देणे अनिवार्य आहे, माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे हे लक्षात ठेवून सहकार्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे, कार्यालयातील कामांचे स्वरूप, नियम, कर्मचाऱ्याचे अधिकार, योजनाची माहिती वेबसाईट वर अथवा सुचना फलकावर अद्यावत ठेवली पाहिजे, असे नमूद केले.
सदर माहिती अधिकार दिनांच्या वेळी प्रश्नमंजुषा घेण्यात आली सदर प्रश्नमंजुषेवेळी मनीषा वास्ते, गिरीषचंद्र वाघमारे ज्योतीराम भोसले, सदाशीव कोळी, सुरेश राठोड, समीर शेख, मृणालीनी शिंदे, संदीप घोडके, शहानवाज शेख, बसवराज बिराजदार, रुपाली मोरे, स्नेहा जाधव, अंजली पाटील, आरती मैंदळकर, सुरेखा तोंडसे, मिलन बिराजदार, श्रीकांत माने, चंद्रकांत जगताप, अजीज सय्यद, महेश गायकवाड,मनोहर राठोड, दिपाली देंडे प्रज्वल कुर्ले यांनी भाग घेतला.










