सोलापूर : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, माजी आ. रेखा खेडेकर, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुनराव तानपूरे हे मंगळवार 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर असे दोन दिवस सोलापूर दौर्यावर येणार आहेत. मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याशी सोलापुरातील डाकबंगला येथे संवाद साधणार आहेत. मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी सर्व कक्षाच्या पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवासंघाचे जिल्हाअध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले आहे.
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभुमिवर व संघटन वाढीबाबत कार्यकर्त्याशी संवाद व्हावा यासाठी या दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. 30 नोव्हेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता सोलापूर शहरात आगमन होणार आहे. सायंकाळी 6 वाजता सायंं. 6 वाजता शिवश्री सतिश भोसले यांच्या निवृत्ती समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. रात्री शासकीय विश्रामगृहात मुक्काम राहणार आहे. बुधवार 1 डिसेंबर रोजी 10 ते 11.15 वाजेपर्यंत गाठी भेटी, 11.30 ते 1 वाजेपर्यंत मुसा खान यांच्या पुुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत शासकिय विश्रामगृहात मराठा सेवा संघ , संलग्नित 33 कक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5 ते 5.30 वाजता नियोजित राजर्षी शाहू महाराज स्मारक परिसर पाहणी, छत्रपती संभाजी महाराज चौकात करण्यात येणार्या नुतणीकरणास भेट देऊन उस्मानाबादकडे रवाना रवाना होणार आहेत.