दक्षिण सोलापूर- राज्याचे माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त इंगळगी येथे पाणपोईचा शुभारंभ माजी सैनिक श्री चंद्रकांत गाडेकर व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बसवराज गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून पाणपोई उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालय शेजारी नागरीकांसाठी आर ओ फिल्टर पाण्याची सोय करण्यात आली आहे. पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत येथे नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद बनसोडे, पत्रकार राहुल वंजारे, आमसिद्ध कोरे, रफिक शेख, श्रीमंत वंजारे, नागनाथ कांबळे, मेघराज गंभीरे, बिलेणी कोटे, शिवा बनसोडे, अविनाश सोनकडे, लक्ष्मण घोडके, रहिमान शेख, अल्लीभाई शेख, रवि माने आदी उपस्थित होते.