• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

MUHS नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे, BAMU आणि शिवाजी विद्यापीठ उपांत्य फेरीत

Yes News Marathi by Yes News Marathi
February 7, 2026
in इतर घडामोडी
0
MUHS नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे, BAMU आणि शिवाजी विद्यापीठ उपांत्य फेरीत
0
SHARES
1
VIEWS

कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठ शिक्षक व कर्मचारीवृंद यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा सोलापुरात होत असून पाचव्या दिवशी साखळी फेरीचे शेवटचे 6 सामने पार पडले व त्यात सकाळच्या सत्रात नाशिकच्या MUHS नाशिक, बाटु लोणेरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने आणि दुपारच्या सत्रात पुणे येथील सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर, मराठवाडा BAMU, सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठांनी विजय मिळविले. पैकी शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), MUHS नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.

पाचव्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे रोहित गमरे (बाटु लोणेरे) याने लगावलेले नाबाद शतक. 53 चेंडूत 9 चौकार, 5 षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. तसेच BAMU संघाने स्पर्धेतील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 245 करत तब्बल 150 धावांनी सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जितेंद्र पाटील, निखिल शिंदे, जयराम हंबर्डे, जय देशमाने, रवी पारधी या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली आणि पुणे विद्यापीठाच्या मनीष गायकवाड याने सलग तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार पटकाविला. रविवारी दोन्ही उपांत्य सामने होणार असून सोमवारी तिसऱ्या स्थानाचा व अंतिम सामना होणार आहे.

या स्पर्धेत एकूण 17 संघांनी सहभाग नोंदविला असून त्यांची विभागणी 4 गटात करण्यात आली होती. प्रथम साखळी पद्धतीने टी20 पद्धतीत लेदर चेंडूवर रंगीत पोशाखात अतिशय सुंदर नेटके नियोजन अंतर्गत सामने पार पडले. चारही मैदानावर सोलापूरच्या विद्यापीठाचे कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक हे समन्वयाची भूमिका पार पाडत असून जिल्हा क्रिकेट पंच संघटनेचे सर्वोतोपरी सहकार्य मिळत आहे.

पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर व प्र.कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व प्र.कुलसचिव तथा क्रीडा संचालक डॉ.अतुल लकडे यांच्या मुख्य नियोजनात सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल रेल्वे मैदान, भंडारी स्पोर्ट्स क्लब व दयानंद कॉलेज या ठिकाणी रोज 2 सामने होत असून पाचव्या दिवशी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर जितेंद्र पाटील, सुनील थोरात यांना तर रेल्वे मैदानावर क्रीडा शिक्षक नागटिळक यांच्या हस्ते विनायक शिंदे (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) व डॉ.मलिक रोकडे यांच्या हस्ते महेंद्र बनकर यांना सामनावीराचे पुरस्कार देण्यात आले.
तसेच दयानंद कॉलेज मैदानावर शतकवीर रोहित गमरे, मनीष गायकवाड यांना आणि भंडारी मैदानावर संदीप चौधरी, खताळ बामू यांना देखील सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक :
1) इंदिरा गांधी पार्क स्टेडियम
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक : 144/6 (20)
निखिल शिंदे नाबाद 71, रामदास गुंबडे व अभिषेक देशमुख 12, संदीप भागवत व योगेश जाधव 10, अवांतर 15 धावा
जितेंद्र पाटील, रश्मिकांत जाधव, किशोर पवार, चंदन मोरे व अरुण सपकाळे प्रत्येकी 1 बळी.
पराभूत विरुद्ध
बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव : 148/4 (14.2)
जितेंद्र पाटील नाबाद 59, स्नेहल कुवर नाबाद 29, अरविंद गिरनारे 20, किशोर पवार 17, अवांतर 13 धावा
निखिल शिंदे 41/2, मिलिंद ठाकरे 1 बळी.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली : सर्व बाद 131 (18.2)
अनिल चव्हाण 30, अविनाश के. 20, प्रवीण पहानाते सचिन मून 15, अवांतर धावा 17
मुक्तार शेख सुनील थोरात ज्ञानेश्वर भोई प्रत्येकी 2 बळी, मुकुंद माळी हनुमंत लोखंडे प्रत्येकी 1 बळी
विजयी विरुद्ध
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : 133/3 (16.2)
उमराव मिटकरी नाबाद 43, सुनील थोरात 31, हनुमंत लोखंडे 24, अवांतर धावा 17
सतीश एस.,अनिल चव्हाण, प्रवीण पहाणते प्रत्येकी 1 बळी

2) रेल्वे मैदान
MAFSU नागपुर : 120/4 (20)
अतुल ढोक 33, संदीप रिंधे 22, राजेश लिमसे व प्रकाश घुले 20
शशिकांत दाभाडे 27/2, योगेश दळवी, राजेश्वर मुपडे प्रत्येकी 1 बळी
पराभूत विरुद्ध
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर : 121/3 (15.3)
विनायक शिंदे 40, विक्रम कोंढावळे नाबाद 28, विशाल हिळगे नाबाद 23
अजित माळी, नितीन डोंगरे, विठ्ठल धायगुडे प्रत्येकी 1 बळी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर : 135/8 (20)
निनाद राऊत 24 दुर्गेश बैस 23 रितेश पुर्काम ईश्वर कुटे 19, सुरज सूर्यवंशी 17 रमेश शेवरे 11
सतपाल गायकवाड 23/4, गौरव दानवे 24/2, सचिन भिंगारदे, भगवान राठोड प्रत्येकी 1 बळी
विजयी विरुद्ध
कृषी विद्यापीठ राहुरी : सर्वबाद 82 (11.3)
सतपाल गायकवाड 25 सचिन सोनवणे 19 मोहसीन शेख 12 अवांतर धावा 13
महेंद्र बनकर 15/4, रमेश शेवरे 14/3, निनाद राऊत 1 बळी

3) दयानंद कॉलेज मैदान
स्वामी रामतीर्थ विद्यापीठ नांदेड : 142/6 (20)
जयराम हंबर्डे 63, नारशि कागदा 27, रशीद शेख 15, अवांतर धावा 12
आदेश सोनार व अल्पेश कोरपे प्रत्येकी 2 बळी
पराभूत विरुद्ध
BATU लोणेरे : 146/3 (17.4)
रोहित गमरे नाबाद 102, दिशांत शिंदे 22, मेहुल कोरपे 12
शैलेश कांबळे 20/2, रशीद शेख 1 बळी.

VNMKV परभणी : सर्व बाद 83 (16.3)
पराभूत विरुद्ध
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे : 86/2 (11.4)
मनीष गायकवाड नाबाद 48, दीपक गजरमल 17, नितीन प्रसाद 10, अवांतर 11 धावा
मारोती शेल्लाळे माणिक ढगे प्रत्येकी 1 बळी.

4) भंडारी स्पोर्ट्स क्लब
KKSU रामटेक : 56/9 (13)
जावेद तुरक 18, अवांतर धावा 12
संदीप चौधरी 17/3, पुष्कर तऱ्हाळ 6/3, योगेश राऊत 13/2 बळी.
पराभूत विरुद्ध
MUHS नाशिक : 57/1 (5.4)
नंदकिशोर ठाकरे 26, नंदकिशोर वाघ 12, अवांतर 10 धावा
निलेश राठोड 1 बळी.

BAMU मराठवाडा विद्यापीठ : 245/4 (20)
जय देशमाने 72, रवी पारधी 67, जितेंद्र पाटील 21, खताळ 30, मोहित शेख नाबाद 34
किरण नांदणे 40/2, अनिल मेश्राम 1 बळी
विजयी विरुद्ध
SGBAU अमरावती : 95/9 (20)
किरण नांदणे 25, अविनाश असणारे 16, अवांतर 18 धावा, सचिन भरडे 12
खताळ बामू 14/4, रणजीत तांगडे 17/3 बळी


Previous Post

नूतन महापौर विनायक कोंड्याल यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानास भेट.

Next Post

चबुतऱ्यासोबतच बसवण्णांचा पुतळा दुरुस्ती देखील सुरु

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
चबुतऱ्यासोबतच बसवण्णांचा पुतळा दुरुस्ती देखील सुरु

चबुतऱ्यासोबतच बसवण्णांचा पुतळा दुरुस्ती देखील सुरु

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026